Amritsar Rail Accident : मी ब्रेक दाबला मात्र, रेल्वे थांबली नाही ; रेल्वेचालकाचा दावा

Amritsar Rail Accident : मी ब्रेक दाबला मात्र, रेल्वे थांबली नाही ; रेल्वेचालकाचा दावा

अमृतसर : ''मी रेल्वेचा ब्रेक दाबला होता. मात्र, रेल्वे थांबली नाही. त्यानंतर लोकांनी दगडफेक करण्यास सुरवात केली. त्यामुळे रेल्वेचा स्पीड वाढवला'', असा दावा रेल्वेचालक अरविंद कुमार यांनी केला. विजयादशमीनिमित्त रावणदहनाच्या कार्यक्रमावेळी शुक्रवारी मोठी रेल्वे दुर्घटना घडली. यामध्ये 61 लोकांचा मृत्यू झाला.

अमृतसरमध्ये रावणदहनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम पाहण्यासाठी मोठी गर्दी जमली होती. काही लोक रेल्वेरुळावर थांबून हा कार्यक्रम पाहत होते. त्यादरम्यान भरधाव आलेल्या रेल्वेने अनेकांना चिरडले. यामध्ये 61 जणांचा मृत्यू झाला तर काही लोक जखमी झाले होते. या अपघाताची चौकशी करण्यासाठी रेल्वेचालकाकडे विचारपूस केली जात आहे. यादरम्यान रेल्वेचालकाने सांगितले, की "'मी रेल्वेचा इमर्जन्सी ब्रेक दाबला होता. मात्र, रेल्वे थांबली नाही. त्यानंतर सलग हॉर्नही वाजवला होता. मात्र, लोकांनी दगडफेक करण्यास सुरवात केली. त्यामुळे रेल्वेचा स्पीड वाढवला''. 

दरम्यान, भारतीय दंडसंहिता कलम 304, 304 ए आणि 338 च्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com