Amruta Fadnavis Net Worth : बापरे! एवढी आहे अमृता फडणवीस यांची संपत्ती l Amruta Fadnavis Net Worth devendra fadnavis deputy CM maharashtra | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Amruta Fadnavis Net Worth

Amruta Fadnavis Net Worth : बापरे! एवढी आहे अमृता फडणवीस यांची संपत्ती

Amruta Fadnavis Net Worth : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस बऱ्याच स्टायलीश आणि टॅलेंटेड आहेत. अमृता सिंगींग आणि बँकिंग मॅनेजमेंट क्षेत्राबरोबरच मॉडेलिंग क्षेत्रातही बऱ्याच अॅक्टिव्ह आहेत. त्यांची फॅशन आणि स्टाइल स्टेटमेंट बॉलिवूड अॅक्ट्रेस पेक्षा कमी नाही. चला जाणून घेऊया त्या किती संपत्तीच्या मालकीण आहेत.

अमृता फडणवीस सध्या त्यांना करण्यात आलेल्या ब्लॅकमेलिंगमुळे चर्चेत आल्या आहेत. त्यांना ब्लॅकमेल करणारा बुकी अनिल जयसिंघानी आणि त्याची मुलगी अनिक्षा यांना पोलीसांनी ताब्यत घेतले आहे.

अमृता या गायिका म्हणून कार्यरत असतात. त्यांच्या गाण्याचे बरेच व्हिडीओ, ऑडिओ प्रसिद्ध आहेत. शिवाय त्या सोशल मीडियावरपण बऱ्याच अॅक्टिव्ह असतात. त्यांच्या फॉलोवर्सची संख्या लाखोंमध्ये आहे. त्यांच्या ड्रेसिंग सेंसमुळेही त्या बऱ्याचदा चर्चेत असतात.

अमृता फडणवीस यांची संपत्ती

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २००६ मध्ये अमृता रानडे यांच्याशी लग्न केलं. त्यांना एक मुलगी आहे. जिचं नाव दिविजा फडणवीस आहे. अमृता फडणवीस नागपूर अॅक्सिस बँकेच्या असोसिएट उपाध्यक्षा आहेत. त्यांच्या संपत्तीविषयी बोलायचं तर २०१९मध्ये नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा निवडणुकीत सादर झालेल्या एफीडिएटनुसार देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःची आणि पत्नीची स्थावर आणि जंगम मालमत्तेचे डिटेल्स दिले होते. त्याविषयी ABP न्युजमध्ये आलेल्या वृत्तानुसार...

  • अमृता फडणवीस यांच्याकडे ९९.३ लाख रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. २०१४ मध्ये ही किंमत ४२.६० लाख रुपये होते.

  • प्रतिज्ञापत्रानुसार अमृताने २.३३ कोटी रुपयांची शेअर बाजारात गुंतवणुक केली आहे.

  • रोख रक्कम १२,५०० रुपये आणि बँकेत ३ लाख ३७,०२५ रुपये आहेत. २०१४ मध्ये बँकेत १ लाख ८८१ रुपये होते.