दिल्लीच्या पोलिस आयुक्तपदी अमूल्यकुमार पटनाईक

पीटीआय
मंगळवार, 31 जानेवारी 2017

नवी दिल्ली -  दिल्लीच्या पोलिस आयुक्तपदी अमूल्यकुमार पटनाईक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्या 19 जानेवारी रोजी तत्कालीन पोलिस आयुक्त आलोककुमार वर्मा यांची "सीबीआय'च्या संचालकपदी नियुक्ती झाल्याने हे पद रिक्त झाले होते. केंद्रीय गृहमंत्रालयाने पटनाईक यांच्या नियुक्तीची आज घोषणा केली.

पटनाईक हे भारतीय पोलिस सेवेच्या (आपीएस) 1985च्या बॅचचे अधिकारी आहेत. ते विशेष आयुक्त (प्रशासन) म्हणून कार्यरत होते. पटनाईक, धर्मेंद्रकुमार आणि दीपक मिश्रा हे दिल्ली पोलिस आयुक्तपदाच्या शर्यतीत होते. त्या दोघांपेक्षा कनिष्ठ असलेल्या पटनाईक यांची या पदावर वर्णी लागली आहे. ते राष्ट्रपती पोलिस पदक विजेते अधिकारी आहेत. सध्या धर्मेंद्रकुमार हे केंद्रीय राखीव पोलिस दलाचे महासंचालक आहेत, तर मिश्रा हे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे महासंचालक आहेत. दोघेही 1984च्या बॅचचे अधिकारी आहेत.

Web Title: amulya kumar patnaik to be Delhi's next police commissioner