पाकिस्तान झिंदाबाद म्हणणाऱ्या, अमुल्यानं दिल्या होत्या शिवजयंतीच्या शुभेच्छा!

टीम ई-सकाळ
Friday, 21 February 2020

अमुल्यानं पाकिस्तान जिंदाबाद म्हणणारी फेसबुक फोस्ट गेल्या आठवड्यातच शेअर केली होती. सध्या त्यात पोस्टचा स्क्रीन शॉट शेअर होत आहे.

बेंगळुरू : बेंगळुरूमध्ये नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात (सीएए) सुरू असलेल्या आंदोलनात पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा दिल्यामुळं अमुल्या नावाची मुलगी देशभरात चर्चेचा विषय ठरली. तिनं स्टेजवर पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या. त्यानंतर तिला पोलिसांनी स्टेजवरून खाली उतरवलं. तिला कोर्टानं 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली आहे. पण, तिनं पाकिस्तान जिंदाबाद म्हणणारी फेसबुक फोस्ट गेल्या आठवड्यातच शेअर केली होती. सध्या त्यात पोस्टचा स्क्रीन शॉट शेअर होत आहे. त्याचबरोबर तिनं फेसबुकवरून शिवजयंतीच्या शुभेच्छाही दिल्या होत्या. 

ताज्या बातम्यांसाठी ई-सकाळचे ऍप डाऊनलोड करा

शिवजयंतीला काय म्हणाली अमुल्या?
खरोखरच इस्लाम व हिंदू विरोधाभासी रंग आहेत. एक दैवी चित्रकारच असतो जो ते रंग एकजीव करत असतो, त्याच्या छटा ओढत असतो. जर मशीद असेल तर, त्या दैवी चित्रकाराच्या आठवणीसाठी प्रार्थना केली जाते, आणि ते मंदीर असेल तर त्याच्या उत्कट ओढीसाठी घंटानाद केला जातो. अशा आशयाची इंग्रजी पोस्ट करत तिनं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या शुभेच्छा दिल्या होत्या.

आणखी वाचा - ट्रम्प यांच्या पत्नीचं गिफ्ट आणि महाराष्ट्र कनेक्शन

आणखी वाचा - पाकिस्तान जिंदाबाद म्हणणारी, अमुल्या आहे तरी कोण?

kt07n1h

श्रीलंका, नेपाळही जिंदाबाद!
अमुल्या ही स्पष्टवक्ती म्हणून, परिचित आहे. सोशल मीडियावर प्रचंड एक्टिव्ह असणारी मुलगी म्हणून तिची ओळख आहे. त्यामुळचं गेल्या काही महिन्यांत बेंगळुरूत सीएए विरोधात झालेल्या जवळपास प्रत्येक आंदोलनाच्या स्टेजवर अमुल्याच्या हातात माईक देण्यात आला होता. पण, कालच्या आंदोलनात तिनं पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा दिल्यामुळं अमुल्या अडचणीत आली आहे. तिच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. फेसबुक अकाऊंटवर 16 फेब्रुवारीला एक पोस्ट करताना, हिंदुस्तान, पाकिस्तानसह श्रीलंका, नेपाळ, हे देशही जिंदाबाद असल्याचं म्हटलं होतं. तिच्या अकाऊंटवर सध्या ही पोस्ट दिसत नाही. पण, तिच्या पोस्टचा स्क्रीन शॉट सध्या व्हायरल होत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: amulya leona noronha facebook post shivjayanti pakistan zindabad