Guinness Book: भारतीय तरुणाचा विक्रविक्रम; आनंद महिंद्रांकडून कौतुक

Guinness Book of World Records: मनिपूरच्या थौनाओजम निरंजॉय सिंग (Thounaojam Niranjoy Singh) याने एका मिनिटात १०९ पुश-अप (finger-tip push-ups) पूर्ण करून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव कोरलं आहे.
Guinness Book of World Records
Guinness Book of World RecordsSakal

मनिपूरच्या थौनाओजम निरंजॉय सिंग (Thounaojam Niranjoy Singh) याने एका मिनिटात १०९ पुश-अप (finger-tip push-ups) पूर्ण करून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये (Guinness Book of World Records) नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. त्याने यापूर्वीचा एका मिनिटात १०५ पुश-अप मारण्याचा स्वतःचाच जुना विक्रम मोडला आहे. अझ्टेक स्पोर्ट्स मणिपूरने इम्फाळ येथील अझ्टेक फाईट स्टुडिओ येथे आयोजिलेल्या पुश-अप मारण्याचा उपक्रमात त्याने हा विश्वविक्रम केला आहे. दरम्यान या नव्या विश्वविक्रमानंतर आनंद महिन्द्रा (Anand Mahindra) यांनी ट्विटरच्या माध्यमातून कौतुक केलं आहे. (Thanaojam Niranjoy Singh News Updates)

Guinness Book of World Records
विजयी विश्व तिरंगा प्यारा! कोकणकड्यावर फडकला सर्वात मोठा 73 फुटी तिरंगा; गिर्यारोहकांचा विक्रम, पाहा VIDEO

एएनआयने विश्वविक्रमाचा व्हिडीओ ट्विट केला आहे. ही क्लिप ट्विटरवर मोठ्या प्रमाणात शेअर केली जात आहे. दरम्यान आनंद महिंद्रा तसेच भारताचे कायदा आणि न्याय मंत्री तसेच माजी क्रीडामंत्री किरेन रिजिजू (Kiren Rijiju) यांनी थौनाओजम निरंजॉय सिंग अभिनंदन केले आहे."हा प्रोत्साहनाचा एक असामान्य स्त्रोत आहे. यासाठी ऑलिम्पिक मेडल नाही, परंतु प्रभाव मात्र जगभर आहे. या वन अपमॅनशिपचा प्रभाव जगभर आहेआणि आपण सर्वांनी, कधीनाकधी , याद्वारे आपली फिटनेस पातळी मोजली आहे. हा वर्ल्ड चॅम्प देशातला आहे, याचा अभिमान वाटतो" असं आनंद महिंद्रा ट्विटद्वारे म्हणाले.

Guinness Book of World Records
रॉयल एनफिल्ड क्लासिक ३५०चा विश्वविक्रम; लॉंच होताच गिनीज बुकात नोंद

"एका मिनिटात सर्वाधिक पुश-अप (बोटांच्या टोकांवर) करण्याचा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड सिंगची अविश्वसनीय शक्ती पाहून मला त्याच्या यशाचा खूप अभिमान वाटतो!" असे मंत्री किरेन रिजिजू यांनी ट्विट केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com