'तो' भाजीवाल्याचा तिरंगा आनंद महिंद्रांच्या मनात घर करुन गेला

वृत्तसंस्था
शुक्रवार, 16 ऑगस्ट 2019

महिंद्रा अँड महिंद्रा ग्रुपचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा यांनी गुरुवारी स्वातंत्र्य दिनानिमित्त केलेले ट्विट सध्या इंटरनेटवर चांगलेच व्हायरल झाले आहे. या ट्विटमध्ये भाज्यांपासून तिरंगा साकारण्यात आल्याचे दिसत आहे.

मुंबई : महिंद्रा अँड महिंद्रा ग्रुपचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा यांनी गुरुवारी स्वातंत्र्य दिनानिमित्त केलेले ट्विट सध्या इंटरनेटवर चांगलेच व्हायरल झाले आहे. या ट्विटमध्ये भाज्यांपासून तिरंगा साकारण्यात आल्याचे दिसत आहे.

भारताच्या ७३ व्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा काल आनंद महिंद्रा यांनी ट्विटवरुन दिल्या. त्यानंतर रात्री पावणे अकराच्या सुमारास त्यांनी एक फोटो आपल्या अकाऊण्टवरुन ट्विट केला आहे. तो फोटो सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

हा फोटो ट्विट करताना आनंद महिंद्रा म्हणतात, “(स्वातंत्र्य दिनाचा) दिवस संपत आला असला तरी आजच्या दिवसात माझ्या मनात हा फोटो घर करुन राहिलेला आहे. एका भाजीविक्रेत्याने देशाबद्दल असणारे प्रेम आणि विश्वास अशा साध्या पद्धतीने व्यक्त केले आहे. तसं पाहिलं तर बनवण्यासाठी सर्वात स्वस्त पण भावना स्पष्टपणे व्यक्त करणारा हा फोटो आहे. जय हिंद”
 

दरम्यान, हा तिरंगा भाजीविक्रेत्याच्या टोपलीच्या कडेवर आगळ्यावेगळ्या पद्धतीने साकरालेला दिसत आहे. टोपलीमध्ये केशरी रंगासाठी गाजरचा वापर तर सफेद रंगासाठी मध्यभागी मुळा आणि तळाला हिरव्या रंगासाठी भेंडी खोचून तिरंगा तयार करण्यात आल्याचे फोटोत दिसते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Anand Mahindra Posted Tricolor Indian Flag Made By Vegetable Vendor

टॅग्स