'चांद्रयान 2'च्या हृदयाची धडधड सर्व देशाने ऐकली, पण...' आनंद महिंद्राचे ट्विट

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 7 September 2019

चांद्रयान मोहिमेसाठी सर्वस्व पणाला लावलेल्या शास्त्रज्ञांच्या पाठिशी आज सगळा देश उभा आहे. या निराश शास्त्रज्ञांना महिंद्रा अॅण्ड महिंद्राचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा यांनी ट्विटवरुन एक खास संदेश दिला आहे.

मुंबई : अवघ्या देशाचे लक्ष लागून असलेल्या 'चांद्रयान 2' मोहिमेमध्ये विक्रम लँडरचा संपर्क केवळ 2 मिनिटे अंतरावर असताना तुटला. यामुळे सर्व देशाने हळहळ व्यक्त केली. चांद्रयान मोहिमेसाठी सर्वस्व पणाला लावलेल्या शास्त्रज्ञांच्या पाठिशी आज सगळा देश उभा आहे. या निराश शास्त्रज्ञांना महिंद्रा अॅण्ड महिंद्राचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा यांनी ट्विटवरुन एक खास संदेश दिला आहे.

'आज सर्व देश चांद्रयान 2 च्या हृदयाची धडधड ऐकत होता. संपर्क तुटला, पण पहिल्या प्रयत्नात अपयश आले, तर पुन्हा प्रयत्न करा...' असा संदेश महिंद्रा यांनी इस्रोला दिला आहे. 

महिंद्रा कायमच इस्रोच्या कामगिरीचे ट्विटवरुन कौतुक करताना दिसतात. आज चंद्रयान 2 मोहिमेत भारतीय शास्त्रज्ञांना प्रथम दर्शनी हवे तसे यश मिळाले नाही. त्यामुळेच महिंद्रा यांनी सर्व शास्त्रज्ञांना खचून न जाता पुन्हा जोमाने प्रयत्न करण्याचा सल्ला दिला आहे.

दरम्यान, या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी बेंगळुरुला पोहचलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही विक्रम लँडरचा संपर्क तुटल्याने निराश झालेल्या वैज्ञानिकांना धीर दिला. ‘हिंम्मत ठेवा, निराश होऊ नका, तुमचा देशाला अभिमान आहे’, असं मोदींनी इस्रोच्या शास्त्रज्ञांना सांगितलं. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: anand mahindra twits on chandrayaan 2