राष्ट्रपतिपदासाठी आनंदीबेन योग्य उमेदवार: स्वामी

वृत्तसंस्था
बुधवार, 26 एप्रिल 2017

नवी दिल्ली: राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा कार्यकाळ येत्या जुलै महिन्यात पूर्ण होत आहे. नवीन राष्ट्रपती निवडीसाठी सत्ताधारी व विरोधी पक्षांची आतापासूनच मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. यात भाजपचे राज्यसभेतील खासदार सुब्रह्मण्यम स्वामी यांनी यात लक्ष घातले असून "गुजरातच्या माजी मंत्री आनंदीबेन पटेल या राष्ट्रपतिपदासाठी सर्वांत योग्य उमेदवार आहेत,' असे म्हटले आहे.

स्वामी यांनी त्यांच्या ट्विटर हॅंडलवर यासंबंधी पोस्ट केली आहे. "भावी राष्ट्रपती म्हणून आनंदीबेन पटेल या सर्वश्रेष्ठ उमेदवारांपैकी एक आहेत,' असे त्यात म्हटले आहे. "त्या गुजराती असल्याने काय फरक पडतो? मी पण गुजराती जावई आहे, असेही ट्विट स्वामी यांनी केले आहे. या ट्विटवर प्रतिक्रिया म्हणून आलेल्या एका ट्विटला रिट्विट केले आहे. यात राष्ट्रपतिपदासाठी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचे नाव सुचविले आहे. अरविंद भाटिया नावाच्या ट्विटर हॅंडलवरून स्वामी यांच्या ट्विटला प्रतिक्रिया देण्यात आली. त्यात म्हटले आहे की, राष्ट्रपतिपदासाठी सुषमा स्वराज या योग्य उमेदवारांपैकी एक आहे. त्या पंजाबी आहेत, याने काय फरक पडतो. एका महिलेला सन्मान का दिला जाऊ नये?

Web Title: anandiben patel perfect candidates for Presidential position: Swami