''पप्पा, माझ्यावर मित्रांनी अत्याचार केला''

वृत्तसंस्था
मंगळवार, 26 जून 2018

नेल्लोरे जिल्ह्यात राहणाऱ्या 6 वर्षीय पीडित मुलावर त्याच्याच दोन मित्रांनी शारीरिक अत्याचार केला. शाळेच्या उन्हाळी सुट्टीच्या या दोन महिन्यांच्या कालावधीत हा प्रकार घडला. याबाबतचा व्हिडिओ पीडित मुलाच्या वडिलांना मिळाल्यानंतर त्यांनी याप्रकरणाची तक्रार पोलिसांत दिल्यानंतर पोलिसांनी यातील दोघांना अटक केली. 

हैदराबाद : एका 6 वर्षीय मुलावर त्याच्या दोन मित्रांनी शारीरिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. शाळेच्या उन्हाळी सुट्टीत या मुलाच्या दोन मित्रांनी त्याच्यावर अत्याचार केला असल्याचा समोर आले. ही घटना आंध्रप्रदेशच्या नेल्लोरे जिल्ह्यात घडली. याबाबतची माहिती देणारा व्हिडिओ पीडित मुलाने आपल्या वडिलांना पाठवल्यानंतर ही घटना समोर आली.

नेल्लोरे जिल्ह्यात राहणाऱ्या 6 वर्षीय पीडित मुलावर त्याच्याच दोन मित्रांनी शारीरिक अत्याचार केला. शाळेच्या उन्हाळी सुट्टीच्या या दोन महिन्यांच्या कालावधीत हा प्रकार घडला. याबाबतचा व्हिडिओ पीडित मुलाच्या वडिलांना मिळाल्यानंतर त्यांनी याप्रकरणाची तक्रार पोलिसांत दिल्यानंतर पोलिसांनी यातील दोघांना अटक केली. 

याप्रकरणी पीडित मुलाच्या वडिलांनी सांगितले, की आठ दिवसांचे काम आटोपल्यानंतर मी घरी परतलो. तेव्हा त्याची आई त्याच्या लहान भावाला सांभाळत होती. त्याच्या आईने त्याला याबद्दल विचारल्यानंतर त्याचा राग अनावर झाला. तेव्हा त्याने आईशी भांडण केले आणि रागात त्याने ताट फेकून दिले. 

तो अत्यंत निरागस, काळजी घेणारा होता. मी ऑफिसला जात असताना तो मला नेहमी बाय-बाय करत असे. मात्र, त्याचे हे वागणे अचानक बदलल्याने आम्हाला याची काळजी वाटली. त्यानंतर त्याला यावर अधिक विचारले असता त्याच्या दोन मित्रांनी त्याच्यावर शारीरिक अत्याचार करण्यात आल्याचे व्हिडिओच्या माध्यमातून त्याने मला सांगितले.  

Web Title: Andhra Boy 6 Tells Father On Video Of Alleged Sex Assault By Friends