खबरदार! खोट्या बातम्या दिल्या तर...

वृत्तसंस्था
गुरुवार, 31 ऑक्टोबर 2019

राजशेखर यांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात काढलेला आदेश केवळ प्रिंट आणि इलेक्‍ट्रॉनिक वृत्त माध्यमांपुरताच मर्यादित होता.

अमरावती (आंध्र प्रदेश) : देशात आज सोशल मीडियाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. याद्वारे अनेक गोष्टींची माहिती नागरिकांना होत असली तरी त्यांना चुकीची माहिती मिळण्याची किंवा चुकीची दिशा मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळेच आंध्र प्रदेश सरकारने अशी चुकीची, खोटी माहिती, बातमी पसरविणाऱ्यांविरोधात आवाज कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत.

'खोट्या, आधारहीन आणि अवमानजनक' बातम्या दिल्यास त्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्याबातची अधिसूचना आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय. एस. जगनमोहन रेड्डी यांनी काढली आहे. जगनमोहन यांचे वडील आणि दिवंगत माजी मुख्यमंत्री राजशेखर रेड्डी यांच्या काळात ही अधिसूचना स्थगित करण्यात आली होती. 

- पवार कुटुंबियांच्या फोटोत दिसणाऱ्या या आजी कोण आहेत?

राजशेखर यांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात काढलेला आदेश केवळ प्रिंट आणि इलेक्‍ट्रॉनिक वृत्त माध्यमांपुरताच मर्यादित होता. मात्र, नवी अधिसूचना सोशल मीडियालाही लागू करण्यात आली आहे. सरकारविरोधात खोटी, कोणताही पुरावा नसताना आणि अवमानजनक बातमी प्रसिद्ध केल्यास संबंधित विभागाच्या सचिवांना कायदेशीर कारवाई करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत.

- मनसेच्या एकमेव आमदाराचा पाठिंबा कुणाला?

काही वृत्तपत्र, इलेक्‍ट्रॉनिक माध्यमे आणि सोशल मीडियावर जाणूनबुजून सरकारची आणि सरकारी अधिकाऱ्यांची प्रतिमा मलिन करण्याचे काम होत असल्याचे सरकारच्या निदर्शनास आल्याने हे पाऊल उचलल्याचे माहिती आयुक्त टी. विजय कुमार यांनी नव्या अधिसूचनेत म्हटले आहे.

- 'सोनेबंदी' ही फक्त अफवाच!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Andhra CM Y S Jaganmohan Reddy order to sue media organisations over false news