आंध्र प्रदेशात अपघातानंतर विजेच्या धक्का बसून 20 जणांचा मृत्यू

वृत्तसंस्था
शुक्रवार, 21 एप्रिल 2017

हैदराबादः ट्रक विजेच्या खांबावर आदळल्यानंतर वीजेची तार विविध वाहनांवर पडल्यानंतर विजेच्या धक्क्याने 20 जणांचा जागीच मृत्यू झाला. आंध्र प्रदेशातील छित्तूर जिल्ह्यातील येरपेडू या गावामध्ये ही घटना घडली, अशी माहिती पोलिसांनी आज (शुक्रवार) दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रकचालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने ट्रक विजेच्या खांबावर जोरात जाऊन आदळला. यामुळे वीजेच्या खांबावरील तार रस्त्यावरील विविध वाहनांवर पडली. विजेचा धक्का बसून 20 जणांचा जागीच मृत्यू झाला तर 20 जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आज दुपारी पावणे दोनच्या सुमारास ही घटना घडली. अपघातानंतर ट्रक चालक व वाहक फरारी झाले आहेत.

प्रत्यक्षदर्शिंनी सांगितले की, ट्रक अतिशय वेगात आला आणि विजेच्या खांबावर जाऊन आदळला. यामुळे वीजेची तार तुटून विविध वाहने व पत्र्याच्या दुकानांवर पडली. यामध्ये नागरिकांचा मृत्यू झाला.

दरम्यान, अपघाताची घटना घडल्यानंतर पोलिस अधिकारी व सरकारी अधिकाऱयांनी घटनास्थळाला भेट दिली. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातामध्ये मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या नातेवाईकांना राज्य सरकारने 5 लाख रुपयांची मदत जाहिर केली आहे.

Web Title: andhra pradesh: 20 killed, 20 injured as truck accident