वाढदिवस ठरला अखेरचा! इमारत कोसळून तिघांचा मृत्यू, तीन जण गंभीर जखमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Andhra Pradesh Building Collapsed

वाढदिवस ठरला अखेरचा! इमारत कोसळून तिघांचा मृत्यू, तीन जण गंभीर जखमी

विखाखापट्टनम येथे मोठी दुर्घटना घेडली आहे. आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ तीन मजली इमारत कोसळली आहे. या दुर्घटनेत तिघांचा मृत्यू झाला आहे तर 3 जण जखमी असल्याचं सांगण्यात येत आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रामजोगी पेटा परिसरात ही दुर्घटना घडली आहे.

विशाखापट्टणमचे सीपी सी श्रीकांत यांनी दिलेल्या माहिती नुसार, बुधवारी मध्यरात्री इमारत कोसळल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत पोलिसांनी ६ जणांना वाचवले आहे तर ३ जणांचा मृत्यू झाला आहे. या इमारतीच्या शेजारीच पाया भरण्यासाठी जमीन खोदल्याचे आढळून आले. तसेच बुधवारी (२२ मार्च) शेजारी बोअरवेलचे खोद काम चालू होते. त्यामुळे ही इमारत कोसळली असू शकते. सध्या या प्रकरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे.

टॅग्स :accident