Women's Day 2023 : ज्जे बात ! भारतात पहिल्यांदाच एका पोरीने बनवलीय बियर कंपनी, परदेशातही होतंय कौतुक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Inspirational Women's of India

Women's Day 2023 : ज्जे बात ! भारतात पहिल्यांदाच एका पोरीने बनवलीय बियर कंपनी, परदेशातही होतंय कौतुक

Inspirational Women's of India : प्रॉपर शिक्षण घेऊन आंतरराष्ट्रीय स्तरावर बीयर बनवून विकणारी स्त्री... जरा दुर्मिळ आहे नाही? अशात तो व्यवसाय सुरु करुन यशस्वी उद्योजिका म्हणून प्रसिद्धी मिळवलेली पहिली स्त्री माहीती आहे का? १९ व्या शतकात फ्रांसमध्ये अशी एक महिला होऊन गेली जीने आपली स्वतःची शॅम्पेनची कंपनी सुरु केली आणि शॅम्पेनला आंतरराष्ट्रीय स्थान मिळवून दिले. जर तुम्हाला बबली शॅम्पेनबद्दल माहिती असेल तर त्याच्या उद्योजक मॅडम क्लिककोट या आहेत.

याच क्लिककोटचा आदर्श ठेवत भारतातल्या एका महिलेने एकवेगळी फील्ड निवडली आहे. डी रसग्ना राव या विशाखापट्टणममधील 33 वर्षीय तेलुगू महिला उद्योजक ज्या पूर्ण भारताच्या पहिल्या महिला सूक्ष्म आणि व्यावसायिक मद्यनिर्मिती उद्योजक ठरल्या आहेत.

याबाबत बोलतांना रसग्ना म्हणाल्या, “१८०० च्या दशकात, अगदी फ्रान्समध्येही स्त्रियांसाठी हे अत्यंत कठीण झाले असावे. पण जग बदलतं आहे, सिंगापूरच्या एका वितरकाने मला सांगितले की भारतातील पहिल्या महिला ब्रुअरी मालकासोबत काम करायला ते खूप उत्सुक आहेत."

समाजाच्या विरोधात जाणे सोप्पं नाहीये

भारतातील दारू व्यवसायातील स्त्रिया ही नक्कीच न ऐकलेली गोष्ट आहे. सगळ्या रूढींच्या आणि समाजाच्या विरोधात जाऊन आव्हान स्वीकारणे कठीण होते पण पुढे जात रसग्ना यांनी विशाखापट्टणममध्ये पहिली मायक्रोब्रुअरी स्थापन केली. आता एक पाऊल पुढे टाकून त्यांना बिअर ब्रँड लाँच करण्याचा विचार करता आहेत, ज्यात ही बिअर महिलांद्वारे उत्पादित केली जात आहे.

अशी निर्माण झाली या व्यवसायात उत्सुकता :

रसग्ना या काही काळासाठी स्पेनमध्ये वास्तव्याला होत्या, माद्रिदच्या कॉम्पुटेन्स युनिव्हर्सिटीमध्ये एमबीएचे शिक्षण घेत असतांना स्मार्ट सिटी कन्सल्टंटच्या कामात गुंतलेले असतांना बर्‍याच ब्रुअरीजचा अभ्यास करता त्यांना या व्यवसायाबद्दल उत्सुकता निर्माण झाली आणि त्यांनी भारतात ते सुरु करण्याचा निर्णय घेतला.

७०% कर्मचारी महिला :

रसग्ना यांच्या, विशाखापट्टणमच्या उपक्रमानंतर, त्या मागच्या वर्षी गोव्यात गेल्या आणि एक व्यावसायिक ब्रुअरी उद्योजक बनल्या. आपल्या हा भारतातील पहिला बिअर ब्रँड असेल ज्याची स्थापना एका महिलेने केली आहे. त्यांच्या कंपनीत मशीन ऑपरेटरसह ७०% कर्मचारी महिला आहेत शिवाय महिला फक्त एचआर आणि मार्केटिंगपुरत्या मर्यादित नाहीत. सध्या अमेरिका, दुबई आणि सिंगापूरमधील वितरकांशी त्यांचं बोलणं सुरु आहे.

घरच्यांकडून आहे ठाम पाठिंबा :

उद्योगातील आव्हानांबद्दल बोलताना त्या म्हणतात, “माझे वडील आणि पती दोघांनीही मला खूप पाठिंबा दिला आहे. खरंतर, एका बँकरने मला सांगितले की मी माझ्या व्यवसायासाठी कर्ज मिळवण्यासाठी माझ्या पतीला बोर्डात आणले पाहिजे कारण हा व्यवसाय स्त्रिया करुच शकत नाही.”