चंद्राबाबू नायडूंचे मोदींना 'ओपन चॅलेंज'

वृत्तसंस्था
बुधवार, 2 जानेवारी 2019

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडूंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना चॅलेंज केले आहे. त्यांनी मोदींना खुल्या चर्चेचे आव्हान दिले असून यामध्ये विचारले आहे की, तुमच्या पंतप्रधान पदाच्या कारकिर्दीत काय झाले ते तुम्ही सांगावे.

अमरावती- आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडूंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना चॅलेंज केले आहे. त्यांनी मोदींना खुल्या चर्चेचे आव्हान दिले असून यामध्ये विचारले आहे की, तुमच्या पंतप्रधान पदाच्या कारकिर्दीत काय झाले ते तुम्ही सांगावे.

मागील साडेचार वर्षांच्या कार्यकाळात देशाला काय फायदा झाला यावर आपल्याशी चर्चा करावी असे आव्हानच एन चंद्राबाबू नायडू यांनी दिले आहे. मंगळवारी (ता.01) पंतप्रधान मोदींनी दिलेल्या मुलाखतीवर प्रतिक्रिया देताना त्यांनी मोदी सरकारच्या काळात देशाने आर्थिक वाढीचा अपेक्षित दर गाठला का? असा प्रश्न विचारला आहे. यावेळी नायडू म्हणाले की, तत्कालीन यूपीए सरकारच्या काळातही आर्थिक वाढीचा दर चांगला नसेल. पण या सरकारच्या काळातही हा चांगला नाही. जीएसटी आणि नोटाबंदीमुळे आर्थिक वाढ झाली का? मोदी सरकारने घेतलेल्या निर्णयांमुळे देशाची आर्थिक प्रणाली उद्ध्वस्त झाल्याचा आरोपही त्यांनी केला. 

दरम्यान, नोटाबंदी हा देशाच्या अर्थव्य़वस्थेला दिलेला झटका नव्हता. आम्ही जनतेला वर्षभरापूर्वीच इशारा दिला होता. जर तुमच्याकडे काळा पैसा असेल, तर तो बँकेत जमा करा, त्यावरील दंड भरा आणि मोकळे व्हा. मात्र, त्यांनी मोदी इतरांसारखेच वागतील असा समज करून घेतला आणि त्याचे परिणाम वेगळेच पाहायला मिळाले असल्याचा खुलासा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल दिलेल्या मुलाखतीत केला होता. 

Web Title: Andhra Pradesh Cm ChandrababNaidu Challenges To Pm Narendra Modi To Speak On Country Economy