चंद्राबाबूंनी घेतली केजरीवालांची भेट ; तिसरी आघाडी करणार स्थापन ?

वृत्तसंस्था
बुधवार, 4 एप्रिल 2018

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी आम आदमी पक्षाचे संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची आज (बुधवार) भेट घेतली.

हैदराबाद : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी आम आदमी पक्षाचे संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची आज (बुधवार) भेट घेतली. दिल्लीतील आंध्र भवन येथे चंद्राबाबूंनी केजरीवाल यांची भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये तिसरी आघाडी स्थापन करण्याबाबत चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे.  

andhra pradesh assembly

केजरीवाल आणि चंद्राबाबू या दोन्ही नेत्यांमध्ये विविध महत्वपूर्ण विषयांवर चर्चा झाली. या चर्चेदरम्यान तिसरी आघाडी स्थापन करण्याबाबत चर्चा झाली असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, याबाबतची अधिकृत माहिती केजरीवाल किंवा चंद्राबाबू या दोघांकडूनही अद्याप देण्यात आलेली नाही. आंध्रप्रदेश राज्याला विशेष दर्जा देण्याबाबत असलेल्या 'आंध्रप्रदेश पुनर्निर्माण कायदा, 2014' आणि आंध्रप्रदेश राज्यावर केंद्राकडून अन्याय केला गेल्याचे चंद्राबाबू नायडूंचे म्हणणे आहे.

दरम्यान, आंध्र प्रदेश राज्याला विशेष राज्याचा दर्जा देण्याबाबत चंद्राबाबू नायडूंनी आक्रमक पवित्रा घेत आहेत. यासाठी त्यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून (एनडीए) बाहेर पडण्याचा निर्णयही घेतला होता. त्यानंतर केजरीवाल आणि नायडू या दोन्ही नेत्यांमध्ये तिसरी आघाडी स्थापन करण्याबाबत चर्चा झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

Web Title: Andhra Pradesh CM Chandrababu Naidu Meet Delhi CM Arvind Kejriwal