मुलांना शाळेत पाठवा अन् 15 हजार मिळवा; सरकारची योजना

पीटीआय
गुरुवार, 9 जानेवारी 2020

इंग्रजीत मिळणार शिक्षण

तिरुपती : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय. एस. जगनमोहन रेड्डी यांनी आज राज्य सरकारच्या 'अम्मा वोडी' या महत्त्वाकांक्षी योजनेला सुरवात केली. मुलांच्या शिक्षणासाठी धडपडणाऱ्या गरीब मातांना या योजनेच्या माध्यमातून आर्थिक मदत केली जाणार आहे. या योजनेच्या माध्यमातून लाभार्थ्यांना वार्षिक पंधरा हजार रुपयांचे वित्तीय साहाय्य केले जाणार आहे 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शिक्षण व्यवस्थेमध्ये आमूलाग्र बदल करण्याच्या उद्देशानेच या योजनेची आखणी करण्यात आली असून, देशातील ही अशा प्रकारची पहिलीच योजना असल्याचे सूत्रांनी सांगितले. राज्यामध्ये शिक्षणासाठी अनुकूल वातावरण तयार व्हावे म्हणून सरकारने शैक्षणिक संस्थांच्या पायाभूत संरचनेमध्येच बदल करण्याचा निर्धार केला असून, यासाठी चौदा हजार कोटी रुपयांचा निधी राखून ठेवण्यात आला आहे. 

इंग्रजीत शिक्षण

जगन सरकारने यंदा राज्यातील सर्वच सरकारी शाळांमध्ये इयत्ता पहिली ते सहावीपर्यंत शिक्षणाची भाषा म्हणून इंग्रजीला अनिवार्य केले असून, पुढील चार वर्षांमध्ये हीच व्याप्ती इयत्ता दहावीपर्यंत नेण्याचा सरकारचा विचार आहे. 

Image

योजनेची व्याप्ती 

थेट लाभार्थी

- 43 लाख मुले 
- 82 लाख माता
==============
योजनेसाठीचा निधी : 6 हजार 318 कोटी 

==============

देशातील पहिलीच योजना 

- यांचा लूक बदलणार :

-  45 हजार सरकारी शाळा 

- कनिष्ठ महाविद्यालये - 471

- पदवी महाविद्यालये आणि वसतिगृहे - 148

- माध्यान्ह भोजन योजनेवरील खर्च - 360 कोटी 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Andhra Pradesh CM YS Jaganmohan Reddy launches Amma Vodi