चित्तूर जिल्ह्यात अपघातात चार स्पॅनिश नागरिक ठार

वृत्तसंस्था
शनिवार, 5 ऑगस्ट 2017

चित्तूर (आंध्र प्रदेश): आंध्र प्रदेशच्या चित्तूर जिल्ह्यात ट्रक आणि मिनी बस यांच्यात झालेल्या अपघातात मिनी बसच्या चालकासह पाच जण ठार झाले. मृतांमध्ये चार स्पॅनिश नागरिक असून दोन महिलांचा समावेश आहे, असे पोलिसांनी सांगितले.

त्याचप्रमाणे स्पॅनिश नागरिकासह अन्य दोन जण जखमी झाले असून त्यातील एकाची प्रकृती गंभीर आहे. विनसेंन्ट प्रेझ, जोसेफा मोरन, फ्रान्सिस्को पेड्रोसा आणि निवेस लोपेझ अशी अपघातातील मृतांची नावे आहेत. अपघातात मरण पावलेला बसचा चालक हा स्थानिक रहिवासी असून त्याची ओळख अद्याप पटलेली नाही. या बसमध्ये चालकासह 11 जण होते.

अनंतपूरमू जिल्ह्यातून हे सर्वजण पुड्डूचेरीकडे चालले असताना मदनपल्ले- पुंगानुरू रस्त्यावरील एका वळणावर हा अपघात झाला. ग्रामीण विकास ट्रस्टच्या पुढाकाराने हे सर्वजण ग्रामीण विकास बघण्यासाठी स्पेनहून आले होते. अनंतपूरमू जिल्ह्यातील गावात ते विकासकामे बघण्यासाठी गेले होते.

Web Title: andhra pradesh news Four Spanish citizens killed in accident