पैसे दे नाहीतर 'तो' व्हिडिओ व्हायरल करेन

वृत्तसंस्था
शनिवार, 30 जून 2018

पीडित विद्यार्थिनी येथील एका महाविद्यालयात आभियांत्रिकीचे शिक्षण घेत आहे. मागील वर्षी फेब्रुवारीमध्ये तिच्या महाविद्यालयातील एका विद्यार्थ्याने त्याच्या वाढदिवसानिमित्त मित्र-मैत्रिणींना पार्टी दिली होती. त्यादरम्यान त्याने पीडित विद्यार्थिनीला जबरदस्तीने दारू पाजली. त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला. तसेच त्याने बलात्काराचा व्हिडिओही काढला होता.

हैदराबाद : आभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱया एका 22 वर्षीय विद्यार्थिनीवर बलात्कार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. पीडित विद्यार्थिनीच्या महाविद्यालयातील वरिष्ठ वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्याने तिच्यावर बलात्कार केला. त्याने बलात्काराचा व्हिडिओही तयार केला. आता हा व्हिडिओ व्हायरल करु, असे ब्लॅकमेल करत त्यासाठी त्याने 10 लाखांची मागणी केली.

पीडित विद्यार्थिनी येथील एका महाविद्यालयात आभियांत्रिकीचे शिक्षण घेत आहे. मागील वर्षी फेब्रुवारीमध्ये तिच्या महाविद्यालयातील एका विद्यार्थ्याने त्याच्या वाढदिवसानिमित्त मित्र-मैत्रिणींना पार्टी दिली होती. त्यादरम्यान त्याने पीडित विद्यार्थिनीला जबरदस्तीने दारू पाजली. त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला. तसेच त्याने बलात्काराचा व्हिडिओही काढला होता. त्यानंतर हा व्हिडिओ व्हायरल करू अशाप्रकारे ब्लॅकमेल आणि नेहमी त्रास देत असे. तसेच त्याने 10 लाखांची मागणीही केली होती, अशी माहिती पीडित तरुणीने पोलिसांना दिली. 

दरम्यान, पीडित विद्यार्थिनी संबंधित विद्यार्थी हे दोघेही आभियांत्रिकीचे शिक्षण घेऊन उत्तीर्ण झाले होते. त्यानंतर पोलिसांनी पीडित विद्यार्थिनीच्या तक्रारीवरून सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल केला असून, त्याला अटक करण्यात आली आहे.

Web Title: Andhra Student Raped Assault Filmed Man With Video Demands 10 Lakhs