Loksabha 2019 : मुरली मनोहर जोशींनी अडवानींना लिहिलेले पत्र 'फेक'

वृत्तसंस्था
रविवार, 14 एप्रिल 2019

एएनआयने ट्विट करत याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. एएनआयने म्हटले आहे, की आमच्या वॉटरमार्कसह भाजप नेते मुरली मनोहर जोशी यांचे सोशल मीडियावर प्रसिद्ध करण्यात आलेले पत्र फेक आहे. त्यांनी अशा प्रकारचे कोणतेही पत्र लिहिलेले नाही.

नवी दिल्ली : भाजपचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांनी लालकृष्ण अडवानींना संविधान धोक्यात आहे या आशयाचे लिहिलेले पत्र फेक असल्याचे एएनआयने स्पष्ट केले आहे. कारण, या पत्रावर एएनआयचा वॉटरमार्क होता.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी संविधान अडचणीत आणले असून, पक्ष वाढविलेल्या ज्येष्ठांना कसे डावलले जात आहे. तसेच या निवडणुकीत भाजपला कमी जागा मिळतील, या आशयाचे पत्र मुरली मनोहर जोशी यांनी अडवानींना लिहिल्याचे व्हॉट्सअॅप आणि ट्विटरवर प्रसिद्ध झाले होते. या पत्रावर एएनआयचा वॉटरमार्क होता. त्यामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली होती. या पत्रात असेही लिहिले होते, की 24 तारखेला भेटल्यानंतर भविष्याबाबत ठरवू. लोकसभा निवडणुकीत हे पत्र आल्याने राजकीय चर्चांना उधाण आले होते. पण, हे पत्र फेक असल्याचे स्पष्ट झाले आहे.

एएनआयने ट्विट करत याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. एएनआयने म्हटले आहे, की आमच्या वॉटरमार्कसह भाजप नेते मुरली मनोहर जोशी यांचे सोशल मीडियावर प्रसिद्ध करण्यात आलेले पत्र फेक आहे. त्यांनी अशा प्रकारचे कोणतेही पत्र लिहिलेले नाही.

Web Title: ANI Refutes Alleged Murli Manohar Joshi Letter Wherein He Predicts Dismal BJP Performance In LS Polls