Rafale Deal : अनिल अंबानींना 1120 कोटींची करमाफी

वृत्तसंस्था
शनिवार, 13 एप्रिल 2019

- राफेल करारानंतर फ्रान्सच्या अधिकाऱ्यांनी अनिल अंबानींच्या फ्रान्समधील टेलिकॉम कंपनीला केली 143.7 मिलियन युरो करमाफी 

नवी दिल्ली : राफेल करारानंतर फ्रान्सच्या अधिकाऱ्यांनी अनिल अंबानींच्या फ्रान्समधील टेलिकॉम कंपनीला 143.7 मिलियन युरो म्हणजे सुमारे 1120 कोटी रुपयांची करमाफी दिली, याबाबतचा दावा फ्रेंच वृत्तपत्र 'ले माँड'ने केला आहे. त्यानंतर आता ही माहिती समोर आली आहे.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडून राफेल करारावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर वारंवार टीका केली जात आहे. त्यानंतर आता याच मुद्यावरून ही मोठी माहिती समोर आली आहे. 2015 या वर्षात फेब्रुवारी ते ऑक्टोबर यादरम्यान राफेल लढाऊ विमान खरेदीसाठी करार सुरू होता. या करारासाठी भारत आणि फ्रान्स या दोन्ही देशांमध्ये चर्चा सुरु होती. त्यानंतर याच काळात अनिल अंबानींच्या कंपनीचा 143.7 मिलियन युरोंचा (1120 कोटी रुपये) करमाफ करण्यात आला, असे वृत्त 'ले माँड'ने दिले.

दरम्यान, अनिल अंबानींची रिलायन्स डिफेन्स कंपनी राफेल करारातील ऑफसेट भागीदार असल्याची माहितीही समोर आली आहे.

Web Title: Anil Ambani got France tax waiver of Rupees 1120 Crores