अनिल अंबानींकडून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 14 डिसेंबर 2018

नवी दिल्ली : राफेल विमान खरेदीमध्ये गैरव्यवहार झाल्याच्या विरोधी पक्षांच्या आरोपाने घायाळ झालेल्या केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला आज (शुक्रवार) सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचे उद्योगपती अनिल अंबानी यांनी स्वागत केले आहे. फ्रान्सकडून 36 राफेल जेट विमाने खरेदी करण्याच्या करारातील ऑफसेट हक्क रिलायन्स डिफेन्सला देण्याच्या निर्णयातही आक्षेपार्ह काहीच सापडले नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. सरकारने रिलायन्स डिफेन्सला फायदा करून देण्यासाठी किंवा या करारात कोणताही व्यावसायिक पक्षपात झाला नसल्याचे सांगितले आहे.
 
अनिल अंबानी यांनी न्यायालयाच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. शिवाय ते म्हणाले की, ''रिलायन्स ग्रुप आणि माझ्याविरोधात करण्यात यणारे सर्व आरोप निराधार होते. शिवाय मला राजकीय हेतूने लक्ष्य केले जात होते. आता मात्र त्यावर न्यायालयाच्या निर्णयामुळे शिक्कामोर्तब झाले आहे. देशाच्या सुरक्षेची काळजी घेणे आमची जबाबदारी असून सरकारच्या 'मेक इन इंडिया' मोहिमेमध्ये सहभागी होण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न होता.''

 'राफेल विमान खरेदीच्या प्रक्रियेमध्ये कोणतीही त्रुटी नाही', असा स्पष्ट निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने देत प्रकरणी चौकशीची मागणी करणाऱ्या सर्व याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावल्या आहेत. 

Web Title: Anil Ambani Says Rafale Order Proves Falsity Of Allegations Against Me