बैजल यांनी घेतली शपथ; केजरीवालांची उपस्थिती

वृत्तसंस्था
शनिवार, 31 डिसेंबर 2016

दिल्लीचे माजी नायब राज्यपाल नजीब जंग यांनी 22 डिसेंबर रोजी अचानक राजीनामा दिला होता. जंग यांची जागा आता बैजल यांनी घेतली आहे. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनीही जंग यांचा राजीनामा स्वीकारत बैजल यांच्या नियुक्तीचा आदेश दिला होता. बैजल हे दिल्लीचे 21 वे नायब राज्यपाल आहेत. 

नवी दिल्ली - माजी केंद्रीय गृहसचिव अनिल बैजल यांची आज (शनिवार) दिल्लीच्या नायब राज्यपालपदाची शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्याला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल उपस्थित होते. 

दिल्लीचे माजी नायब राज्यपाल नजीब जंग यांनी 22 डिसेंबर रोजी अचानक राजीनामा दिला होता. जंग यांची जागा आता बैजल यांनी घेतली आहे. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनीही जंग यांचा राजीनामा स्वीकारत बैजल यांच्या नियुक्तीचा आदेश दिला होता. बैजल हे दिल्लीचे 21 वे नायब राज्यपाल आहेत. 

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात बैजल यांनी केंद्रीय गृहसचिव म्हणून काम पाहिले होते. बैजल हे 1969 च्या तुकडीतील अधिकारी असून, ते 2006 मध्ये निवृत्त झाले. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्या कार्यकाळात सुरू करण्यात आलेल्या जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी पुनरुत्थान मिशनचा (जेएनएनयूआरएम) आराखडा आणि अंमलबजावणीमध्ये बैजल यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. विवेकानंद इंटरनॅशनल फाउंडेशन या 'थिंक टॅंक'च्या कार्यकारी मंडळाचे बैजल हे सदस्य आहेत. या संस्थेशी संबंधित असलेल्या अजीत दोवाल यांची राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी सरकारने यापूर्वीच नियुक्ती केली आहे.

Web Title: Anil Baijal takes oath as Lieutenant Governor of Delhi, CM Kejriwal also present