कोरोनाविरोधात दिल्लीने कसली कंबर; दहा हजार खाटांच्या रुग्णालयाचे उद्‌घाटन 

Largest covid care centre
Largest covid care centre

नवी दिल्ली - भारतातील कोरोना रुग्णांच्या संख्येत आघाडीवर असलेल्या राजधानी दिल्लीमध्ये नायब राज्यपाल अनिल बैजल यांनी आज सरदार पटेल कोविड केअर सेंटर या रुग्णालयाचे उद्‌घाटन केले. दहा हजार खाटांची सोय असलेले हे रुग्णालय अशा प्रकारच्या जगातील सर्वांत मोठ्या रुग्णालयांपैकी एक आहे. कोरोनाविरोधातील लढाईत या रुग्णालयाचा जनतेला मोठा फायदा होईल, असे बैजल यावेळी म्हणाले. 

राधास्वामी सत्संग बिआस येथे हे रुग्णालय उभारण्यात आले आहे. दिल्ली सरकारच्या प्रशासकीय मदतीने भारत-तिबेट सीमा पोलिस दलाने (आयटीबीपी) या रुग्णालयाची उभारणी केली असून तेच व्यवस्थापनही पाहणार आहेत. नायब राज्यपाल बैजल यांनी रुग्णालयची पाहणी करून ‘आयटीबीपी’चे कौतुक केले. ते म्हणाले,‘‘केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या मार्गदर्शनाखाली दिल्लीमध्ये आता जगातील एक मोठे उपचार केंद्र उभारले गेले आहे. या रुग्णालयात गंभीर रुग्णांवर विशेष लक्ष दिले जाणार आहे. तसेच, स्वच्छताही काटेकोरपणे राखली जाणार आहे.’’ या रुग्णालयाचे दोन विभाग असून कोविड केअर सेंटरमध्ये लक्षणे न दिसणाऱ्या कोरोनाग्रस्तांवर उपचार होणार आहेत, तर दुसऱ्या विभागात लक्षणे दिसणाऱ्या रुग्णांवर उपचार होणार आहेत. रुग्णालयात डॉक्टरांना आणि रुग्णांची ने-आण करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक गाड्यांची सोय करण्यात आली आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

असे आहे रुग्णालय 
१७०० फुट : लांब 
७०० फूट : रुंद 
२० : फुटबॉल मैदानांइतका आकार 
२०० : विभाग 
५० : प्रत्येक विभागातील खाटा 
२००० : डॉक्टर व इतर कर्मचारी 

अमित शहांची कोविड केंद्राला भेट 
गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाशेजारी बांधलेल्या एक हजार खाटांच्या कोविड केंद्राला भेट दिली. संरक्षण विभागाच्या जमिनीवर असेलेले हे रुग्णालय संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) केवळ बारा दिवसांत उभे केले आहे. शहा आणि राजनाथसिंह यांच्याबरोबर केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवालही उपस्थित होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com