
Delhi Girl Accident : कोण निधी? ती खोटं बोलतेय; अंजलीच्या आईच्या दाव्यानंतर नवा ट्विस्ट
दिल्लीतल्या अंजली अपघात प्रकरणाला दिवसेंदिवस वेगवेगळं वळण लागत आहे. अंजलीच्या मैत्रिणीने केलेले दावे आता अंजलीच्या घरच्यांनी फेटाळले आहेत.
२० वर्षीय अंजली सिंग हिचा दिल्लीमध्ये एका अपघातात मृत्यू झाला. तिला एका कारने धडक दिली आणि त्यानंतर ती त्या कारसोबत जवळपास १० ते १२ किलोमीटर फरफटत गेली होती. अपघातावेळी तिच्या सोबत असलेली मैत्रिण निधीने अंजली दारूच्या नशेत असल्याचा दावा केला होता. पण आता तिच्या घरच्यांनी हा दावा फेटाळला आहे.
हेही वाचा: Delhi Girl Accident Case : मृत तरुणीची मैत्रीण निधी तिला मरणासाठी सोडून पळ काढते
अंजलीची आई रेखा देवीने याबद्दल सांगितलं आहे. इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, रेखा देवी यांनी सांगितलं की, माझी मुलगी कधीही दारू पित नव्हती. ती कधीही दारू पिऊन घरी आली नव्हती. निधी खोटं बोलत आहे.
हेही वाचा: Delhi Girl Accident: "चुक तिची होती?"मृत तरुणीच्या मैत्रिणीने केला खुलासा
रेखा देवी पुढे म्हणाल्या की त्यांनी कधीही निधीला त्यांच्या मुलीसोबत पाहिलेलं नाही. कधी निधी अंजलीसोबत घरीसुद्धा आलेली नाही. निधीसुद्धा अंजलीसोबत झालेल्या घातपातामध्ये सहभागी असल्याचा आरोप रेखादेवी यांनी केला आहे. तसंच तिची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.