'अण्णा भाऊं'चा होणार महापुरुषांच्या यादीत समावेश; आठवलेंची घोषणा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

'अण्णा भाऊं'चा होणार महापुरुषांच्या यादीत समावेश; आठवलेंची घोषणा
अण्णा भाऊ साठेंचा महापुरुषांच्या यादीत होणार समावेश; केंद्रीय मंत्री आठवलेंची घोषणा

'अण्णा भाऊं'चा होणार महापुरुषांच्या यादीत समावेश; आठवलेंची घोषणा

नवी दिल्ली : लोकशाहीर अण्णा भाऊ साठे (Anna Bhau Sathe) यांचा महापुरुषांच्या यादीत समावेश होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी याची घोषणा केली. यासंदर्भात आठवले यांनी अधिकाऱ्यांकडे विचारणा केल्यानंतर अण्णा भाऊंच्या नावाचा यादीत समावेश होईल, असं आश्वासन त्यांनी दिलं. दैनिक सकाळनं यासंदर्भात 'अण्णा भाऊ साठेंची अवहेलना' या मथळ्याखाली पहिल्यांदा वृत्त दिलं होतं. (Anna Bhau Sathe will be in list of great men Ramdas Athavale announcement)

हेही वाचा: राज्याचं कोरोनाबाबतचं काम संथगतीनं; गती वाढवावी: केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार

अधिकाऱ्यांना काय म्हणाले आठवले?

अण्णा भाऊ साठे जे दलित समाजातील मोठे साहित्यकार होते. यांच्या जयंतीला निधी उपलब्ध होण्याबाबत मागणी करणारं एक पत्र आंबेडकर फाऊंडेशनकडे आलं होतं. यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर, संत कबीर यांच्या जयंतीला २ लाख रुपयांची मदत केली जाते, त्याचधर्तीवर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीला देखील आपण मदत केली पाहिजे, असं सांगितलं. आठवलेंच्या या सुचनेवर तुम्ही अर्ज पाठवून द्या आम्ही निधीबाबतची सर्व कार्यवाही करुन घेऊ, असं आश्वासन या अधिकाऱ्यांनी दिलं. मंत्री रामदास आठवले यांनी फोनवरुन या अधिकाऱ्यांशी संवाद साधला. त्यामुळं आता अण्णा भाऊ साठे यांचा महापुरुषांच्या यादीत समावेश होण्याचा आणि यासंदर्भात दिल्या जाणाऱ्या निधीचा मार्ग मोकळा झाला आहे.

हेही वाचा: ओमिक्रॉननंतर आता 'IHU' ची एन्ट्री; फ्रान्समध्ये आढळला नवा व्हेरियंट

आंबेडकर फाउंडेशननं म्हटलं होतं की, महापुरुषांच्या यादीत अण्णा भाऊंचं नाव समाविष्ट करण्यासाठी त्यांचं कार्य निकषांमध्ये बसत नाही. बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशनच्या बऱ्याच योजना आहेत. विविध राष्ट्रपुरुषांच्या जयंती उत्सवासाठी या फाउंडेशनच्या माध्यमातून २ लाख रुपयांची मदत देण्यात येते. या फाउंडेशनच्या महापुरुषांच्या यादीत बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, कबीर, संत चोखामेळा, संत वाल्मिकी, संत रविदास अशा अनेक महापुरुषांच्या नावाचा या यादीत समावेश आहे. पण अण्णा भाऊ साठे यांच्यासंदर्भात यापूर्वी अशी मागणी झाली नव्हती, असंही यावेळी आठवले यांनी सांगितलं.

हेही वाचा: ओमिक्रॉनची धास्ती! पुण्यातील शाळा 30 जानेवारीपर्यंत राहणार बंद

दरम्यान, पहिल्यांदाच अण्णा भाऊ साठे यांचं नाव महापुरुषांच्या यादीत समाविष्ट करण्याची मागणी झाली तर त्याकडे सकारात्मक पद्धतीनं पाहण गरजेचं होतं. पण अधिकाऱ्यांना त्यांच्याबाबत पुरेशी माहिती नसल्यानं त्यांनी चुकीचं उत्तर दिलं. ही बाब चुकीची आहे, आण्णाभाऊंबाबत अनादर व्यक्त करण्याचा जो प्रयत्न झाला त्याची मी ताबडतोब दखल घेतली असून अण्णा भाऊंच्या नावाचा उल्लेख यादीत करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे, असं स्पष्टीकरण यावेळी मंत्री रामदास आठवले यांनी दिलं.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Desh newsAnna Bhau Sathe
loading image
go to top