अण्णांच्या उपोषणाची केंद्राला धास्ती; गिरीश महाजन दिल्लीत 

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 26 मार्च 2018

अण्णांच्या उपोषणाची केंद्र सरकारला धास्ती 
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी रामलीला मैदानावर सुरू केलेल्या उपोषणाची केंद्र सरकारने धास्ती घेतली असून, पंतप्रधान कार्यालयाच्या निरोपावरून मध्यस्थी करण्यासाठी महाराष्ट्राचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन येथे दाखल झाले आहेत. या उपोषणाबाबत केंद्र सरकार सोमवारी काही ठोस निर्णय घेऊन अण्णांकडे जाईल व तो अण्णांनी स्वीकारल्यास उपोषण मागे घेतले जाईल, अशी दाट चिन्हे आहेत. 

नवी दिल्ली : समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिल्लीत आंदोलन सुरू केल्याने केंद्रात भाजप सरकारवर संकट आले आहे. हजारे व केंद्र सरकार यांच्यात समन्वय घडविण्यासाठी "संकटमोचक' म्हणून राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन कार्य करत आहेत. त्यांच्या जामनेर मतदारसंघात नगराध्यक्षपदासाठी त्यांच्या पत्नी साधना महाजन उभ्या आहेत. आज ते मतदारसंघातच थांबणार होते; मात्र रात्री अचानक अमित शहांचा फोन आल्याने ते दिल्लीला रवाना झाले आहेत. 

अण्णांच्या उपोषणाची केंद्र सरकारला धास्ती 
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी रामलीला मैदानावर सुरू केलेल्या उपोषणाची केंद्र सरकारने धास्ती घेतली असून, पंतप्रधान कार्यालयाच्या निरोपावरून मध्यस्थी करण्यासाठी महाराष्ट्राचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन येथे दाखल झाले आहेत. या उपोषणाबाबत केंद्र सरकार आज (सोमवारी) काही ठोस निर्णय घेऊन अण्णांकडे जाईल व तो अण्णांनी स्वीकारल्यास उपोषण मागे घेतले जाईल, अशी दाट चिन्हे आहेत. 

अण्णा म्हणाले, की महाजन यांचा आज दुपारीही आपल्याला फोन आला होता. मात्र नुसत्या भेटीसाठी व चर्चेसाठी येणे योग्य नाही. सरकार जर काही ठोस निर्णय घेणार असेल तरच या, असे मी महाजन यांना सांगितले आहे. ते उद्या येणार आहेत. सरकारने कृषिमूल्य आयोग घटनात्मक करा यांसारख्या काही मागण्या अर्धवटच मान्य केल्या आहेत. आता सारे काही जनतेसमोर लेखी झाले पाहिजे. 

जनलोकपाल कायदा व शेतकऱ्यांच्या आंदोलनासाठी सुरू केलेल्या या उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी अण्णांचे वजन आज 3 किलोने घटले आहे. त्यांच्या शरीरातील पाण्याचा अंश झपाट्याने कमी होत असून, उद्या त्यांची तब्येत खालावण्याची भीती त्यांच्यावर उपचार करणारे डॉ. धनंजय यांनी दिली. अण्णांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी विविध राज्यांतही आंदोलने सुरू झाली आहेत. दिल्लीत आज संध्याकाळी विविध संघटनांनी इंडिया गेटवर मेणबत्ती मोर्चा काढला होता. 

अण्णांचा मोदी सरकारवर हल्लाबोल 
"यंदाच्या आंदोलनातील गर्दी कमी होण्यामागे लोकांना आंदोलनाची बातमीच कळू नये अशी व्यवस्था केली गेली असून, तसे करणारे लोकशाहीचा गळा आवळत आहेत व ते कोण हे साऱ्या देशाला माहिती आहे,'' अशा शब्दांत अण्णा हजारे यांनी नरेंद्र मोदी सरकारवर आज पुन्हा हल्ला चढविला. "मी मरणार नाही. समाज व देशाच्या भल्यासाठी शंभरीतही याच उत्साहाने लढत राहीन, असेही त्यांनी सांगितले. 

Web Title: Anna Hazare agitation for lokpal bill Girish Mahajan in Delhi