फडणवीस यांच्या भेटीनंतर अण्णांचे उपोषण मागे

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 मार्च 2018

नवी दिल्ली- जनलोकपालची अंमलबजावणी, शेतकऱ्यांना हमीभाव अशा विविध मागण्यांसाठी रामलीला मैदानावर उपोषणाला बसलेल्या अण्णा हजारे यांनी आज 7 दिवसानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीनंतर उपोषण मागे घेतले आहे. लोकपालचा प्रश्न येत्या सहा महिन्यांत सोडविण्याचे आश्वासन सरकारकडून मिळाल्यानंतर त्यांनी उपोषण मागे घेतले.

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे दिल्लीत रामलीला मैदानात सात दिवसांपासून उपोषणाला बसलेले होते. अण्णांची प्रकृती खालावत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले होत. अण्णांनी उपोषण मागे घ्यावे यासाठी जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी देखील अण्णांची भेट घेतली होती. परंतू त्यानंतरही अण्णा आपल्या मागण्यांवर ठाम होते. 

यावेळी कृषी राज्यमंत्री गजेंद्रसिंग शेखावत हे देखील उपस्थित होते. अण्णा हजारे यांना सरकारकडून कोणतेही ठोस आश्वासन मिळाले नसले तरी त्यांच्या मागण्यांना तत्वतः मान्यता देण्यात आली आहे. तसेच अण्णा हजारे यांना पुन्हा आंदोलन करण्याची वेळ येणार नाही असे आश्वासनही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिले.
 
Web Title: ANNA HAZARE ENDS FAST FOLLOWING MEETING WITH MAHARASHTRA CM DEVENDRA FADNAVIS