'लोकपाल'साठी अण्णा हजारे 2 ऑक्टोबरला करणार उपोषण

वृत्तसंस्था
रविवार, 29 जुलै 2018

'मी येत्या 2 ऑक्टोबरला महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त अहमदनगर जिल्ह्यातील राळेगणसिद्धी येथे उपोषण करणार आहे. या उपोषणादरम्यान मी भ्रष्टाचारविरोधी काम करणार आहे''.

- अण्णा हजारे, ज्येष्ठ समाजसेवक

राळेगणसिद्धी : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे येत्या 2 ऑक्टोबरला उपोषण करणार आहेत. 'लोकपाल'च्या मुद्यावरून केंद्र सरकारकडून होत असलेल्या दिरंगाईबाबत अण्णा हजारेंनी उपोषणाचा निर्णय घेतला आहे. तसेच 'भ्रष्टाचारमुक्त भारत'च्या अभियानासाठी नागरिकांनी एकत्र यावे, असे आवाहनही केले.

याबाबत अण्णा हजारे म्हणाले, ''मी येत्या 2 ऑक्टोबरला महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त अहमदनगर जिल्ह्यातील राळेगणसिद्धी येथे उपोषण करणार आहे. या उपोषणादरम्यान मी भ्रष्टाचारविरोधी काम करणार आहे''. यावेळी त्यांनी केंद्रातील एनडीए सरकारवरही टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, लोकपालाची नियुक्ती केली जाईल आणि त्याबाबत लोकपाल बिल लागू करण्यासाठी संसद आणि त्यानंतर 2014 मध्ये राष्ट्रपतींची स्वाक्षरी घेण्यात आली. मात्र, यावर कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. मात्र, लोकपालच्या नियुक्तीवरून केंद्र सरकारकडून विविध कारणे दिली जात असून, दिरंगाई केली जात आहे, असे अण्णा हजारे म्हणाले.

दरम्यान, अण्णा हजारेंनी 2011 मध्ये लोकपाल चळवळीवरून 12 दिवसांच्या उपोषण पुकारले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा त्यांनी उपोषण करणार असल्याचे सांगितले. 

Web Title: Anna Hazare to launch hunger strike for Lokpal from October