बाप रे! कचोरीवाल्याची कमाई एवढी; कर विभागाची नोटीस

वृत्तसंस्था
बुधवार, 26 जून 2019

अलीगढ: कचोरीवाला एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आला असून कर विभागाने दुकानदाराला नोटीस बजावली आहे. अलीगढमधील मुकेश कचोरीवाल्याचे वार्षिक उत्पन्न 60 लाख रुपये ते 1 कोटी रुपये असून मुकेशने जीएसटीसाठी नोंदणी केलेली नाही, असे कारण देत कर विभागाने दुकानदाराला नोटीस बजावली आहे. गेल्या 12 वर्षांपासून मुकेश हे दुकान चालवत असून आतापर्यंत एक रुपयाही कर भरलेलला नाही. 

मुकेश 12 वर्षांपासून कचोरी विकतो आहे. मात्र करचुकवत असल्याची तक्रार आल्याने कर विभागाने काही निरीक्षक दुकानात पाठवून दुकानात होत असल्येला विक्रीबद्दल माहिती मिळविली. दररोज होत असलेली विक्री आणि येणारे ग्राहक यांची पाहणी करून त्याला नोटीस देण्यात आली. सध्या एसआयबीचे अधिकारी चौकशी करत असून  मुकेशने उत्पन्न आणि सर्व खर्चाचे विवरण दिले आहे. कचोरी व्यवसायाची जीएसटीअंतर्गत नोंदणी करावी लागणार असून आता एक वर्षाचा कर भरावा लागणार आहे.  

चाळीस लाख रुपयांपेक्षा जास्त उलाढाल असणाऱ्यांना व्यावसायिकांना जीएसटीसाठी नोंदणी करणे गरजेचे आहे. मात्र मुकेशने त्याचे उत्पन्न चाळीस लाखांहून कमी असल्याचे सांगितले आहे. मला कर विभागाकडून मुद्दाम त्रास दिला जात असल्याचा आरोप देखील मुकेशने केला आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The annual turnover of this Kachori wala in Aligarh is Rs60 lakh