भारताला पुन्हा 26/11 सारख्या हल्ल्याची भीती

वृत्तसंस्था
मंगळवार, 11 एप्रिल 2017

मुंबईवर 2008 साली झालेल्या दहशतवादी हल्ल्याप्रमाणे पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटनांकडून तशाच प्रकारचा आणखी आणखी हल्ला होण्याची भीती आंतरराष्ट्रीय स्तरावरील एका संस्थेच्या अहवालात व्यक्त करण्यात आली आहे.

नवी दिल्ली - मुंबईवर 2008 साली झालेल्या दहशतवादी हल्ल्याप्रमाणे पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटनांकडून तशाच प्रकारचा आणखी आणखी हल्ला होण्याची भीती आंतरराष्ट्रीय स्तरावरील एका संस्थेच्या अहवालात व्यक्त करण्यात आली आहे.

ब्रुसेल्स येथील थिंक टॅंक इंटरनॅशनल क्रायसिस ग्रुपने अमेरिकेच्या दहशतवादी धोरणावरील एक अहवाल नुकताच प्रसिद्ध केला आहे. लष्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मद या भारतविरोधी दहशतवादी संघटनांकडून भारत आणि अमेरिकेला धोका असल्याचे अहवालात म्हटले आहे. या संघटनांसह अन्य काही दहशतवादी संघटनांच्या पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील जिहादींकडून (दहशतवादी) भारत आणि अमेरिकेला धोका असल्याचेही अहवालात म्हटले आहे.

सप्टेंबरमध्ये उरी येथील लष्करी तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानचे संबंधांमध्ये प्रचंड तणाव निर्माण झाला असून संबंध बिघडले आहेत. त्यानंतर प्रत्युत्तरादाखल भारताने पाकव्याप्त काश्‍मिरमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राईक करत दहशतवादी तळांना उध्वस्त केले होते. या पार्श्‍वभूमीवर जर मुंबईवरील 26/11 सारखा हल्ला झाला तर तो परतवून लावणे कठीण जाईल, असेही अहवालात म्हटले आहे.

Web Title: Another 26-11-type strike by Pak-based terror groups could face India’s punitory reaction: Report