
Crime News : उत्तर प्रदेशात पुन्हा एन्काऊंटर! जवानाची हत्या करून पलायन करणाऱ्यांचा खात्मा
उत्तर प्रदेशात पुन्हा एकदा दोन जणांचे एन्काऊंटर करण्यात आले आहे. पोलिसांनी मिळून दोन हल्लेखोरांचा खात्मा केला आहे. चार दिवसांपूर्वी जालौन येथे गस्तीदरम्यान हवालदार भेदजीत यांची हत्या करून पळून गेलेल्या आरोपींच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या.
गुरुवारी महामार्गावर पोलीस चौकीत कर्तव्य बजावत असताना हवालदाराची गोळी झाडून हत्या करण्यात आली होती. हल्लेखोरांना त्वरीत पकडणे पोलिसांसाठी मोठे आव्हान बनले होते. गेल्या चार दिवसांपासून हल्लेखोरांना घेरण्याची कारवाई सुरू होती. अधिकाऱ्यांनी तीन पथके तैनात केली होती.
दरम्यान, रविवारी पोलिसांना जालौन येथील कारखाना परिसरातच आरोपींचा सुगावा पोलिसांना लागला. यानंतर दोन आरोपींना घेराव घालण्यात आला. यावेळी चमकमक देखील झाली. पोलिसांनी देखील पलटवार केला. यामध्ये दोन्ही हल्लेखोरांना गोळ्या लागल्या. दोघांनाही रुग्णालयात पाठवण्यात आले. तेथे दोघांचा मृत्यू झाला. (Crime News)
ओराईच्या एसएचओच्या हाताला आणि दोन हवालदारांच्या बुलेटप्रूफ जॅकेटलाही गोळ्या लागल्या आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही हल्लेखोर आणखी एक घृणास्पद घटना घडवणार होते. कल्लू रहिवासी राहिया आणि रमेश रा. सरसोखी अशी दोघांची नावे आहेत.
अतिक अहमद याच्या एन्काऊंटरनंतर उत्तर प्रदेशात गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी देखील गुन्हेगारांना गंभीर इशारा दिला आहे.