Amritsar Blast: अमृतसर पुन्हा हादरलं; सुवर्ण मंदिराजवळील हेरिटेज स्ट्रीटवर ब्लास्ट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Amritsar Blast

Amritsar Blast: अमृतसर पुन्हा हादरलं; सुवर्ण मंदिराजवळील हेरिटेज स्ट्रीटवर ब्लास्ट

अमृतसर पुन्हा हादरलं. दोन दिवसात दुसऱ्यांदा स्फोटाची घटना समोर आली आहे. दरबार साहिब हेरिटेज स्ट्रीटजवळ सोमवारी सकाळी आणखी एक स्फोट झाला. शनिवारी रात्री उशिरा घडलेल्या घटनेपासून 200 मीटर अंतरावर हा स्फोट झाला. पोलिस घटनेचा तपास करत आहेत. (Another explosion at Amritsar heritage street near Golden Temple 2nd in nearly 24 hours )

श्री हरिमंदिर साहिब जवळील हेरिटेज स्ट्रीट परिसरात सोमवारी सकाळी 6:30 वाजता पुन्हा स्फोट झाला. घटनेच्या वेळी रस्त्यावर फारशी रहदारी नव्हती. अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून, तपास सुरू आहे.

फॉरेन्सिक टीमच्या सदस्यांनी अनेक नमुने ताब्यात घेतले आहेत. जिथे स्फोट झाला, तिथे एक कारही उभी होती, ज्याच्या काचा फुटल्या होत्या. परिसरात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज मिळवण्याचा प्रयत्न पोलिस करत आहेत. डीसीपी परमिंदर सिंग भंडल हेही हेरिटेज स्ट्रीटवर तपासासाठी घटनास्थळी पोहोचले.

याआधी शनिवारी रात्री उशिरा सुवर्ण मंदिराजवळील हेरिटेज स्ट्रीटवरही स्फोट झाला होता. यामध्ये एक जण किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे तर काही इमारतींच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या आहेत. मात्र, हा दहशतवादी हल्ला नसून अपघात असल्याचे पोलिसांनी सांगितले होते.