आणखी एका IAS अधिकाऱ्याचा राजीनामा

वृत्तसंस्था
शुक्रवार, 6 सप्टेंबर 2019

बंगळूर : भारतातील लोकशाही धोक्यात येत चालली आहे. प्रशासकीय सेवेत अलीकडच्या काळात मुस्कटदाबी केली जात असून हे प्रमाण वाढत चालले आहे, अशी कारणे देत आयएएस अधिकारी आपल्या नोकरीचा राजीनामा देत आहेत. देशातील आयएएस वर्तुळातच आतापर्यंत ही चर्चा सुरू होती. मात्र, या पंधरा दिवसांमध्ये आणखी एका आयएएस अधिकाऱ्याने आपल्या नोकरीचा राजीनामा दिल्याने या गोष्टीला गंभीर स्वरूप आले आहे. 

बंगळूर : भारतातील लोकशाही धोक्यात येत चालली आहे. प्रशासकीय सेवेत अलीकडच्या काळात मुस्कटदाबी केली जात असून हे प्रमाण वाढत चालले आहे, अशी कारणे देत आयएएस अधिकारी आपल्या नोकरीचा राजीनामा देत आहेत. देशातील आयएएस वर्तुळातच आतापर्यंत ही चर्चा सुरू होती. मात्र, या पंधरा दिवसांमध्ये आणखी एका आयएएस अधिकाऱ्याने आपल्या नोकरीचा राजीनामा दिल्याने या गोष्टीला गंभीर स्वरूप आले आहे. 

- केवळ एका ट्विटमुळं शेहला रशिदवर देशद्रोहाचा गुन्हा

कर्नाटक केडरमधील 2009 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आणि दक्षिण कन्नड जिल्ह्याचे उपायुक्त एस. शशिकांत सेंथील यांनी आज (शुक्रवार) प्रशासकीय सेवेचा त्याग केल्याने खळबळ निर्माण झाली आहे. या राजीनाम्यानंतर सेंथील यांनी एक सविस्तर पत्रदेखील लिहिले असून, त्यामध्ये त्यांनी वैविध्यपूर्ण लोकशाहीच्या जडणघडणीमध्ये महत्त्वपूर्ण असलेल्या पायाभूत घटकांशीच तडजोड केली जात असल्याचे म्हटले आहे.

येत्या काही दिवसांमध्ये देशाच्या पायाभूत संरचनेसमोरच काही मोठी आव्हाने निर्माण होणार असल्याने अशा स्थितीमध्ये प्रशासकीय सेवेचा त्याग करणेच अधिक चांगले ठरेल, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे. सेंथील यांनी जून 2017 मध्ये दक्षिण कन्नड जिल्ह्याचे उपायुक्त म्हणून सूत्रे स्वीकारली होती. काही मोजक्या सक्रिय अधिकाऱ्यांमध्ये त्यांच्या नावाचा समावेश होता.

Image may contain: text

सेंथील यांच्याविषयी...
सेंथील हे मूळचे तमिळनाडूचे रहिवासी असून, त्यांनी बीई इलेक्ट्रॉनिक्स या शाखेतून प्रथम क्रमांकाने पदवी संपादन केली आहे. सेंथील यांनी 2009 ते 2012 या काळामध्ये बळ्ळारीत सहायक आयुक्त म्हणूनही काम केले होते. तसेच त्यांनी दोन वेळा शिमोगा जिल्हा पंचायतीमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणूनही काम केले होते.

याआधी दोन प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दिले आहेत राजीनामे 
मागील महिन्यामध्ये आयएएस अधिकारी कन्नन गोपीनाथ यांनी प्रशासकीय सेवेचा त्याग केला होता, त्यापाठोपाठ सेंथील यांनीही तोच कित्ता गिरवल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

"ज्यांना आवाज नाही, त्यांचा आवाज होता यावा, म्हणून मी सनदी सेवेत प्रवेश केला होता. पण, येथे मीच माझा आवाज गमावून बसलो असल्याने आता या व्यवस्थेत माझा जीव रमत नाही, अशी खंत कन्नन गोपीनाथन यांनी व्यक्त केली होती.

आपली मते खुलेपणाने व्यक्त करता न येणे, काश्‍मीरमधील नागरिकांचे मूलभूत हक्क हिरावून घेणे आणि ही घटना कोणत्या दुसऱ्या देशात घडल्याप्रमाणे देशवासीयांचे त्याकडे निष्क्रियपणे पाहणे, यामुळे कन्नन व्यथित झाले होते. आणि शेवटी त्यांनी आपल्या नोकरीचा राजीनामा दादरा आणि नगर हवेली प्रशासनाकडे सादर केला होता.

- आता, या व्यवस्थेत जीव रमत नाही!

दुसरे आयएएस अधिकारी शाह फैजल यांनी प्रशासकीय सेवेचा राजीनामा दिला आणि जम्मू-काश्मीर पीपल्स मूव्हमेंट या नव्या पक्षाची स्थापना करत राजकारणात उडी घेतली. काश्मीर खोऱ्यातील तरूणांसाठी नव्या व्यासपीठाची निर्मिती करण्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतला. प्रशासकीय सेवेतून लोकांना रस्ते, पाणी, वीज देता येईल. राजकीय प्रश्न सोडविता येणार नाहीत. ते सोडविले नाहीत, तर काश्मीर खोऱ्यात शांतता नांदू शकणार नाही, म्हणूनच राजकारणात येत असल्याचे त्यांनी सांगितले होते.

- शाह फैझल यांचा काश्मिरमध्ये नवा 'पीपल्स मूव्हमेंट' पक्ष


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Another IAS officer quits