आणखी एका जवानाकडून व्हिडिओ अपलोड

वृत्तसंस्था
मंगळवार, 7 मार्च 2017

नवी दिल्ली- लष्करामधील जवानांकडून सोशल नेटवर्किंग साइटवर व्हिडिओ अपलोड करण्याची मालिका अद्यापही सुरूच आहे. एका जवानाने नुकताच एक व्हिडिओ अपलोड केला असून, अधिकाऱयांवर आरोप केले आहेत.

नवी दिल्ली- लष्करामधील जवानांकडून सोशल नेटवर्किंग साइटवर व्हिडिओ अपलोड करण्याची मालिका अद्यापही सुरूच आहे. एका जवानाने नुकताच एक व्हिडिओ अपलोड केला असून, अधिकाऱयांवर आरोप केले आहेत.

गुजरात येथील जवान सिंधव जोगीदास यांनी व्हिडिओ अपलोड केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, 'लष्करातील अधिकारी मनमानी कारभार करतात. एखाद्या जवानाकडून चूक झाली तर त्याचे कोर्ट मार्शल केले जाते. परंतु, अधिकाऱयांना माफ आहे. जवानांना चांगल्या दर्जाचे जेवणही दिले जात नाही. जवान फक्त जिवंत रहावेत, एवढ्यापुरतेच अन्न दिले जाते. शिवाय, इतर सुविधाही दिल्या जात नाहीत. माझ्या वरिष्ठ अधिकाऱयाकडे काही काम घेऊन गेलो तर मला चौकशीला सामोरे जावे लागले. माझ्याकडे कोणताच पर्याय राहिला नसल्यामुळे व्हिडिओ तयार करून तो सोशल नेटवर्किंगवर अपलोड केला.'

दरम्यान, जम्मू-काश्मीरमधील सीमेवर तैनात असलेले सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) जवान तेज बहादूर यांनी व्हिडिओमधून लष्करातील जेवण व वरिष्ठ अधिकाऱयांवर आरोप केले होते. या व्हिडिओनंतर देशभर खळबळ उडाली होती. या घटनेनंतर विविध जवानांनी व्हिडिओ अपलोड केले होते. यामुळे लष्कराने जवानांना सोशल नेटवर्किंगचा वापर करण्यावर निर्बंध लादले होते. मात्र, अद्यापही जवान आपल्यावर होत असलेल्या अन्यायाबाबत व्हिडिओ शुटींग करून सोशल नेटवर्किंगवर अपलोड करताना दिसत आहेत.

Web Title: Another Indian soldier uploads video complaining about ‘corruption, misbehavior, bad quality food’