सुकमात सापडला आणखी एका नक्षलवाद्याचा मृतदेह

वृत्तसंस्था
शुक्रवार, 28 एप्रिल 2017

सुकमा येथील बुरकापल येथे नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्याच्या ठिकाणी आज (शुक्रवार) आणखी एका नक्षलवाद्याचा मृतदेह सापडला आहे. त्यामुळे या हल्ल्यात ठार झालेल्या नक्षलवाद्यांची संख्या अकरावर पोहोचली आहे.

सुकमा (छत्तीसगढ) : सुकमा येथील बुरकापल येथे नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्याच्या ठिकाणी आज (शुक्रवार) आणखी एका नक्षलवाद्याचा मृतदेह सापडला आहे. त्यामुळे या हल्ल्यात ठार झालेल्या नक्षलवाद्यांची संख्या अकरावर पोहोचली आहे.

बुरकापल येथे नक्षलवाद्यांनी केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या जवानांवर अंदाधुंद गोळीबार केला होता. जवानांनीही प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला. या चकमकीत दहा नक्षलवादी ठार झाले होते. मात्र आज आणखी एका नक्षलवाद्याचा मृतदेह सापडल्याने ही संख्या अकरा झाली आहे. तर सीआरपीएफचे 25 जवान या हल्ल्यात हुतात्मा झाले आहेत. तर अन्य पाच जवान जण जखमी झाले आहेत. हल्लेखोरांवर कडक कारवाई करण्याचे आश्‍वासन केंद्र सरकारने दिले आहे.

क्रिकेटपटू गौतम गंभीर याने या हल्ल्यात हुतात्मा झालेल्या 25 जवानांच्या पाल्यांचा संपूर्ण खर्च उचलणार असल्याचे जाहीर केले आहे.

Web Title: Another Maoist's body recovered death toll at 11