Coronavirus : 'या' माजी मुख्यमंत्र्यांची होणार कोरोना चाचणी

Another patient of doctor treating Lalu Prasad Yadav tests coronavirus positive
Another patient of doctor treating Lalu Prasad Yadav tests coronavirus positive

रांची : राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख आणि चारा गैरव्यवहारप्रकरणी शिक्षा भोगत असलेले लालूप्रसाद यादव यांची कोरोना चाचणी होण्याची शक्‍यता आहे. यादव यांच्या डॉक्‍टरांच्या वॉर्डमध्ये कोरोनाचा रुग्ण आढळल्याने ही चाचणी होणार आहे.

लालू प्रसाद यादव यांना आधीच विविध आजारांचा सामना करावा लागत आहे. त्यांना किडनी आणि मधुमेहाचा त्रास अधिक आहे. अशातच त्यांना आता कोरोनाची चाचणी करण्याची वेळी आली आहे.

कोरोनाला हरवून जॉन्सन पुन्हा कार्यालयात हजर

वाढत्या कोरोनामुळे त्यांना जामिनावर सोडण्याची मागणी त्यांच्या वकिलांनी केली होती. मात्र त्यांना एका वेगळ्या खोलीत ठेवण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार करणारे डॉ. उमेश प्रसाद यांच्या रुग्णालयाच्या वॉर्डमध्ये एक कोरोनाचा रुग्ण आढळून आला आहे. त्यामुळे संबंधित डॉक्‍टरांकडून लालूप्रसाद यादव यांना कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्‍यता असल्याने त्यांची कोरोना चाचणी केली जाणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com