केरळमध्ये आणखी एक अत्याचार

पीटीआय
बुधवार, 11 जुलै 2018

केरळमधील चर्चच्या आणखी एका धर्मगुरुविरुद्ध महिलेने बलात्काराची तक्रार नोंदविली आहे. अलपुझ्झा जिल्ह्यातील कायमकुमल येथे एका महिलेने मलंकरा ऑर्थोडॉक्‍स सिरियन चर्चशी निगडित धर्मगुरू बिनू जॉर्ज यांच्याविरुद्ध बलात्काराची तक्रार केली. 

कायमकुमल (केरळ) : केरळमधील चर्चच्या आणखी एका धर्मगुरुविरुद्ध महिलेने बलात्काराची तक्रार नोंदविली आहे. 
अलपुझ्झा जिल्ह्यातील कायमकुमल येथे एका महिलेने मलंकरा ऑर्थोडॉक्‍स सिरियन चर्चशी निगडित धर्मगुरू बिनू जॉर्ज यांच्याविरुद्ध बलात्काराची तक्रार केली. 

39 वर्षीय पीडित महिलेने तक्रारीत म्हटले की, धर्मगुरू बीनू जॉर्ज यांनी चर्चेसाठी मला कार्यालयात बोलावले आणि लैंगिक शोषण केले. महिलेच्या मते, ही घटना 2014 च्या प्रारंभी घडली आहे. मात्र, याप्रकरणी आता तक्रार करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कौटुंबिक मुद्‌द्‌यावर बोलण्यासाठी धर्मगुरूने पीडित महिलेला बोलावले आणि ती कार्यालयात गेल्यावर तिच्यावर बलात्कार करण्यात आला. याप्रकरणी पोलिस ठाण्यात धर्मगुरूविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, काही आठवड्यांपूर्वीच एक विवाहित महिलेने केरळच्या ऑर्थोडॉक्‍स चर्चशी निगडित असलेल्या चार धर्मगुरूंविरुद्ध बलात्काराची तक्रार केली होती. चार धर्मगुरूंनी ब्लॅकमेल करत अनेकदा अत्याचार केल्याचे तिने आरोप केला आहे.  

 
 

Web Title: Another Rape incident Happened in Kerala