Representational Image
Representational Image

लष्कराने पुन्हा 'सर्जिकल स्ट्राईक' केला; राजनाथसिंह यांचे संकेत

नवी दिल्ली : सीमा सुरक्षा दलाचे हेड कॉन्स्टेबल नरेंद्र शर्मा यांची क्रूर हत्या करून मृतदेहाची विटंबना करणाऱ्या पाकिस्तानी लष्कराला या कृत्याची जबर किंमत मोजावी लागली आहे. खुद्द गृहमंत्री राजनाथसिंह आणि सीमा सुरक्षा दलाचे महासंचालक के. के. शर्मा यांनी या घटनेस पुष्टी दिली आहे. 'आम्ही काही पावले उचलली आहेत. विश्‍वास ठेवा..! खूप काही झालं आहे.. दोन-तीन दिवसांपूर्वी हे केलं आहे.. आता पुढे बघा काय होतंय..' असे वक्तव्य राजनाथसिंह यांनी काल (शनिवार) केले. 

उत्तर प्रदेशमधील मुजफ्फरपूरमध्ये हुतात्मा भगतसिंग यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या एका कार्यक्रमामध्ये राजनाथसिंह यांनी भाषणात हा उल्लेख केला. 

'मी आपल्या जवानांना सांगितले होते.. ते आपले शेजारी आहेत.. स्वत:हून पहिल्यांदा गोळी चालवू नका! पण तिकडून एकही गोळी झाडली गेली, तर मग तुम्ही किती गोळ्या झाडल्या, हे मी विचारणारही नाही', असे राजनाथसिंह म्हणाले. नरेंद्र शर्मा यांची 19 सप्टेंबर रोजी हत्या करून पाकिस्तानी लष्कराने विटंबना केली. त्यामुळे देशभरात संतापाची लाट निर्माण झाली होती. 

या घटनेचा उल्लेख राजनाथसिंह यांनी केला. 'आमच्या जवानाच्या मृतदेहाशी त्यांनी जे काही कृत्य केले, ते सर्वांनीच पाहिले आहे. कदाचित माहीत असेल.. आता काही पावले उचलली आहेत.. मी सांगणार नाही, नेमके काय ते! पण काहीतरी नक्की झाले आहे.. दोन-तीन दिवसांपूर्वीच झाले आहे. आता पुढे बघा काय काय होईल', असे राजनाथसिंह म्हणाले. 

जवानाच्या यांच्या हत्येनंतर सीमा सुरक्षा दलाने तिखट प्रत्युत्तर दिले आहे, अशी माहिती के. के. शर्मा यांनीही दिली. शर्मा यांनी पुरविलेल्या माहितीनुसार, भारतीय लष्कराच्या कारवाईच्या भीतीमुळे पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय सीमेजवळील पाच किलोमीटरपर्यंतचा भाग रिकामा केला आहे. येत्या कही दिवसांमध्ये पाकिस्तानी घुसखोर आणि सैन्याविरोधात मोठी कारवाई करण्याचे संकेत मिळत आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com