आयएसआयच्या संशयित एजंटला मुंबईतून अटक

वृत्तसंस्था
गुरुवार, 4 मे 2017

मुंबई पोलिसांनी उत्तर प्रदेशमधील दहशतवादीविरोधी पथकासोबत केलेल्या संयुक्त कारवाईत बुधवारी रात्री उशिरा मुंबईतून एका संशयित आयएसआय एजंटला ताब्यात घेतले आहे.

मुंबई - मुंबई पोलिसांनी उत्तर प्रदेशमधील दहशतवादीविरोधी पथकासोबत केलेल्या संयुक्त कारवाईत बुधवारी रात्री उशिरा मुंबईतून एका संशयित आयएसआय एजंटला ताब्यात घेतले आहे.

बुधवारी रात्री उशिरा केलेल्या कारवाईत अलताफ अली नावाच्या संशयित आयएसआय एजंटला ताब्यात घेतले आहे. त्याच्यावर आयएसआयच्या निर्देशानुसार झालेल्या अनेक कारवायांमध्ये सहभाग घेतल्याचा आरोप आहे. चौकशीसाठी त्याला उत्तर प्रदेशच्या दहशतवादविरोधी पथकाकडे सोपविण्यात आले आहे. बुधवारीच फैजाबाद येथून आयएसआयचा एजंट असल्याच्या संशयावरून अफताब अली नावाच्या अन्य एका संशयिताला दहशतवादविरोधी पथकाने ताब्यात घेतले होते. पाकिस्तानमधील आयएसआयमधून प्रशिक्षण घेतल्याचा आणि पाकिस्तानमधील उच्चायुक्तांशी संबंध असल्याचा त्याच्यावर आरोप आहे. तर अलताफ हा फैजाबाद येथून बेकायदा कृत्ये करत होता आणि अफताबच्या खात्यात पैसे पाठवत होता. याप्रकरणी फोन चॅट आणि संशयितांनी काढलेले कॅम्प परिसरातील छायाचित्रे असे ठोस पुरावे गोळा करण्याच्या प्रयत्नात दहशतवादविरोधी पथक आहे.

Web Title: Another suspected isi agent arrested