मध्य प्रदेशात झुंडशाहीचा आणखी एक बळी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

mob
मध्य प्रदेशात झुंडशाहीचा आणखी एक बळी

मध्य प्रदेशात झुंडशाहीचा आणखी एक बळी

भोपाळ - मध्यप्रदेशात झुंडशाहीचे आणखी एक प्रकरण समोर आले आहे. एका वृद्ध व्यक्तीला मुस्लिम असल्याच्या संशयावरून जबर मारहाण करून तिचा खून करण्यात आला. चौकशी अंती मरण पावलेल्या व्यक्तीचे नाव हे भंवरलाल जैन असे असल्याचे उघड झाले. याप्रकरणी पोलिसांनी स्थानिक भाजप नेत्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

रतलाम जिल्ह्यातील वयोवृद्ध सरपंच पिस्ताबाई चत्तर यांचे भंवरलाल हे मोठे पुत्र होते. चत्तर यांचे कुटुंबीय १५ मे रोजी एका धार्मिक कार्यक्रमासाठी चितोडगडला गेले होते. सोळा मे रोजी पूजाअर्चा झाल्यानंतर भंवरलाल अचानक बेपत्ता झाले होते त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांचा मृतदेह रामपुरा रोडवर सापडला. भंवरलाल यांना जबर मारहाण करण्यात आल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. याप्रकरणी संशयाची सुई भाजप नेते दिनेश कुशवाह यांच्या दिशेने वळली आहे. सध्या ते भाजपमध्ये नसल्याचा दावा पक्षाकडून केला जातो. दिनेश हे सध्या फरार असून पोलिस त्यांचा युद्धपातळीवर शोध घेते आहे. याघटनेनंतर कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्यावरून माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी शिवराज सरकारवर निशाणा साधला. राज्यातील कायदा व्यवस्था कोठे आहे? आणखी कितीकाळ लोकांना अशा पद्धतीने मारण्यात येणार? असा सवाल कमलनाथ यांनी केला आहे.

Web Title: Another Victim Of Mob Rule In Madhya Pradesh Crime Against Bjp Leader

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top