शशी थरुर यांना अटकपूर्व जामीन मंजूर

वृत्तसंस्था
गुरुवार, 5 जुलै 2018

नवी दिल्ली : सुनंदा पुष्कर मृत्यूप्रकरणी दिल्लीच्या पटियाला हाऊस न्यायलयाने काँग्रेस नेते शशी शरुर यांना आज (गुरुवार) अटकपूर्व जामीन मंजूर केला.थरुर यांना १ लाख रुपयांचे जामीनपत्र भरुन हा जामिन मंजूर करण्यात आला आहे. पोलिसांच्यावतीने सरकारी वकील अतुल श्रीवास्तव यांनी कोर्टात शरुर यांच्या जामिनाच्या मागणीला विरोध केला होता.

न्यायालयाच्या आदेशानुसार, 5 जून रोजी थरुर यांना समन्स पाठवून 7 जुलै रोजी त्यांना न्यायलयात हजर राहण्यास सांगितले होते. आदेश दिल्यानंतर न्यायालयाने थरुर यांच्याविरोधात कारवाई करण्यास पुरेसा आधार असल्याचे म्हटले. त्याचबरोबर थरुर यांना न्यायालयाच्या परवानगीशिवाय परदेशात जाता येणार नसल्याचेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

चार वर्षांपूर्वी थरुर यांच्या पत्नी सुनंदा पुष्कर या दिल्लीतील लीला हॉटेलमध्ये मृत सापडल्या होत्या.

न्यायाधीशांनी या प्रकरणी दिल्ली पोलिसांची प्रतिक्रिया मागविली होती. पोलिसांनी आरोपपत्र दाखल करताना अटकेची गरज नसल्याचे, तसेच चौकशी संपली असून आरोपीला ताब्यात घेण्याची गरज नसल्याचे सांगितल्याचे थरूर यांनी आपल्या अर्जात निदर्शनास आणून दिले होते. त्या पार्श्वभूमिवर हा जामिन मंजूर करण्यात आला आहे.

Web Title: Anticipatory bail agree to shashi tharur