Viral News : अमेरिकन मंत्र्यांचा साधेपणा! भारतात येताच अंस काही केलं की...सर्वत्र होतेय चर्चा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

antony blinken

Viral News : अमेरिकन मंत्र्यांचा साधेपणा! भारतात येताच अंस काही केलं की...सर्वत्र होतेय चर्चा

अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटोनी ब्लिंकन हे सध्या भारताच्या दौऱ्यावर आहेत. अँटोनी ब्लिंकन हे G20 बैठक आणि रायसीना डायलॉगमध्ये सहभागी होण्यासाठी भारतात आले आहेत. भारतात येताच ते चर्चेचा विषय बनले आहेत. त्यांच्या साधेपणाची सर्वत्र चर्चा आहे. आज भारतात पोहोचल्यानंतर त्यांनी अमेरिकन दूतावासात जाण्यासाठी बुलेटप्रूफ कारचा वापर केला नाही, तर ऑटो रिक्षाचा वापर केला. 

अँटोनी ब्लिंकन यांनी एक ट्विट शेअर केले आहे. यामध्ये ते ऑटो रिक्षातून बाहेर पडताना दिसत आहेत. अँटनी ब्लिंकनच नाही तर अनेक अमेरिकन नेते या ऑटो रिक्षांना पसंती देत ​​आहेत. २०२२ च्या सुरुवातीला, अमेरिकन महिला एन एल मेसन, रुथ होल्मबर्ग, शेरिन जे किटरमन आणि जेनिफर बायवॉटर्स यांनी त्यांच्या बुलेटप्रूफ कार सोडल्या आणि काळ्या आणि गुलाबी रंगाच्या ऑटो रिक्षातून प्रवास केला.

antony blinken

antony blinken

अँटोनी ब्लिंकन म्हणाले, माझ्या कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना भेटून मला आनंद झाला. यावेळी त्यांनी कर्मचाऱ्यांचे आभार मानले. लोकांचा लोकांशी संबंध मजबूत करण्यासाठी आणि यूएस-भारत धोरणात्मक भागीदारी पुढे नेण्यासाठी त्यांच्या कठोर परिश्रम आणि वचनबद्धतेबद्दल मी खूप आभारी आहे, असे ब्लिंकन म्हणाले. 

ऑटो रिक्षांबाबतचा अनुभव सांगताना एनएल मेसन म्हणाल्या, ऑटोरिक्षाची मला आवड आहे. मी कुठेही गेली तर मला वाहनांविषयी रूची वाटते. माझ्यासाठी ऑटो रीक्षा माझ्यासाठी खास आहेत. मला प्रवास करायला आवडते. ऑटो रिक्षा पेक्षा माझ्या आयुष्यात काहीही खास नाही.