अनुपम खेर यांचा 'एफटीआयआय'च्या अध्यक्षपदाचा राजीनामा

अनुपम खेर यांचा 'एफटीआयआय'च्या अध्यक्षपदाचा राजीनामा

पुणे : 'फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया'चे (एफटीआयआय) अनुपम खेर यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा आज (बुधवार) दिला. आपण आपल्या कामांमध्ये व्यस्त असल्याचे कारण देत खेर यांनी राजीनामा दिला. 

अभिनेते, दिग्दर्शक अनुपम खेर यांनी 2017 मध्ये एफटीआयआयच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली होती. त्यापूर्वी गजेंद्र चौहान अध्यक्षपदावर असताना त्यांच्या नियुक्तीवरून मोठा वाद निर्माण झाला होता. त्यानंतर एफटीआयआयच्या अध्यक्षपदासाठी अनुपम खेर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यानंतर आता खेर यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.

याबाबत अनुपम खेर यांनी ट्विटरवरून सांगितले, की ''हे माझे भाग्य आहे, की मी प्रतिष्ठित अशा एफटीआयआयचे अध्यक्षपद भूषविले. हा माझ्यासाठी एक चांगला अनुभव होता. मात्र, माझ्या आंतरराष्ट्रीय असाईनमेंट्समुळे माझ्याकडे संस्थेला जास्त वेळ देता येत नाही. त्यामुळे मी माझ्या अध्यक्षपदाचा राजीनामा पाठवत आहे''. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com