नरेंद्र मोदींमुळे लोक गरिबीच्या बाहेर येतायत, अनुराग ठाकूरांचा दावा

भाजप कार्यकर्त्यांनी निःस्वार्थपणे लोकांची सेवा केली.
Anurag Thakur News
Anurag Thakur Newsesakal

हमीरपूर (हिमाचल प्रदेश) : इंदिरा गांधींपासून सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यापर्यंत गरिबी हटाओच्या घोषणा ऐकत होतो. गरिबी निर्मूलन झाले नाही. गरीब मात्र संपण्यास सुरु झाले. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) आणि जागतिक बँकेच्या अहवालात म्हटले गेले की नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या काळात दारिद्र्या रेषेखालील गरीब आता दारिद्र्या रेषेतून बाहेर येऊ लागले आहे. हे सर्व नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi) सरकारच्या काळात झाले आहे, असा दावा केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर (Anurag Thakur) यांनी केला आहे. हमीरपूर येथे आज सोमवारी (ता.२०) त्रिदेव संमेलन पार पडले. त्यावेळ ते बोलत होते. (Anurag Thakur Says, Due To Narendra Modi People Come Out From Poverty)

Anurag Thakur News
गुजराती अग्निपथ योजनेला विरोध करत नाहीत, अभिनेत्याच्या ट्विटवर लोक संतापले

कोविडच्या काळात संघर्ष दिसला. भाजप कार्यकर्त्यांनी निःस्वार्थपणे लोकांची सेवा केली. गरजू लोकांना मास्क आणि राशनचे वाटप करण्यात आले. महामारी आणि उपासमारीपासून लोकांचे बचाव, अर्थव्यवस्था वाचवणे हे कोणत्याही मंत्र्यासाठी आव्हान होते. या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २० तास काम केले.

Anurag Thakur News
तुकोबांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान, पाहा क्षणचित्रे

जर आपण मागील प्रशासनावर अवलंबून असतो, तर आपल्याला दुसऱ्या देशांवर कोरोना लशींसाठी परावलंबी राहावे लागले असते. मात्र धन्यवाद पंतप्रधान मोदींचे आभार ! आता आपल्याकडे दोन कोविड लसी आहेत, असे अनुराग ठाकूर म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com