बंगला तोडफोडप्रकरणी न्यायालयाने मागविला अहवाल

वृत्तसंस्था
रविवार, 24 जून 2018

उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी त्यांना देण्यात आलेल्या सरकारी बंगल्यात तोडफोड केल्याचा आरोप राज्य सरकारकडून करण्यात आला आहे. याप्रकरणी सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिले आहेत.
 

लखनौ - उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी त्यांना देण्यात आलेल्या सरकारी बंगल्यात तोडफोड केल्याचा आरोप राज्य सरकारकडून करण्यात आला आहे. याप्रकरणी सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिले आहेत.

या प्रकरणाची चौकशी करण्यास संबंधित अधिकारी टाळाटाळ करत असल्याचा आरोप होत आहे. या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयाने अहवाल मागितल्यामुळे आता अधिकाऱ्यांसमोर अडचण निर्माण झाली असल्याचे मानले जात आहे. शासकीय निवासस्थान सोडताना त्याची तोडफोड झाल्याचा आरोप अखिलेश यांच्याविरोधात केला जात आहे. 

Web Title: Any order on bungalows to ex CMs can have ramifications, says Supreme Court