'चहाचा उष्टा कप देण्याऐवजी देश दिला'

वृत्तसंस्था
सोमवार, 11 फेब्रुवारी 2019

नवी दिल्ली: 'ज्यांच्या हातात चहाचा उष्टा कप द्यायला हवा, त्यांच्या हातातच जनतेने देश सोपवला आहे.' असे पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.

पोस्टरच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली जात आहे. भाजप नेते अमित मालवीय यांनी एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये एक व्हिडीओही आहे. मालवीय यांनी लिहिले आहे की, 'विरोधी पक्ष मोदींच्या भूतकाळातील गोष्टींवर नेहमीच त्यांना टार्गेट करतात. मागासवर्गीय किंवा अनुसूचित जाती-जमातीचा असणे हा अभिशाप आहे काय?,'

दरम्यान, आंध्र प्रदेशला विशेष राज्याच्या दर्जाच्या मागणीसाठी तेलुगू देसम पार्टीचे प्रमुख आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू हे नवी दिल्लीत केंद्र सरकारविरोधात एकदिवसीय उपोषणास बसले आहेत. यावेळी त्यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ज्यांच्या हातात चहाचा उष्टा कप द्यायला हवा, त्यांच्या हातातच जनतेनं देश सोपवला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना चाय वाला म्हटले जाते. एक चहावाला देशाचा पंतप्रधान झाल्याने मोदींवर जोरदार टीका केली. चंद्राबाबू नायडू यांच्या आंदोलनाला काँग्रेसने पाठिंबा दिला आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ap cm chandrababu naidus dharna in delhi tdp targets pm narendra modi