खाण दुरुस्ती विधेयकासाठी भाजपचे काँग्रेसकडे सहकार्यासाठी आवाहन

उत्तम गावकर
मंगळवार, 13 नोव्हेंबर 2018

सासष्टी :  गोव्यातील खाण प्रश्न मार्गी लागावा यासाठी वेगवेगळ्या स्तरावर प्रयत्न सुरु असून संसदेतील प्रस्तावित खाण दुरुस्ती विधेयकास काँग्रेसकडून सहकार्य मिळावे अशी अपेक्षा विजमंत्री व भाजपचे नेते निलेश काब्राल यांनी व्यक्त केली आहे. 

गोव्याची आर्थिक स्थिती बळकट बनविण्यासाठी खाण व्यवसायासंबंधी संसदेत येणारे दुरुस्ती विधेयक मंजूर होण्यासाठी काँग्रेस पक्षाचे सहकार्य आवश्यक असून हे सहकार्य मिळवून देण्यासाठी अखिल भारतीय काँग्रेसचे सरचिटणीस असलेले नावेलीचे आमदार लुईझीन फालेरो यांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन काब्राल यांनी केले.

नागमोडे - नावेली येथे उभारण्यात आलेल्या 200 केव्ही ट्रान्सफॉर्मरच्या उद्घाटन सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे या नात्याने बोलत होते. यावेळी लुईझिन फालेरो, नावेलीच्या सरपंच विल्मा डिसिल्वा, उपसरपंच पॉल परेरा, तळावलीचे सरपंच स्टिव्हन  गोईश, पंच सदस्य नॅटी कुयेलो, सहाय्यक विज अभियंता दिनेश महाले उपस्थित होते.

गोव्यात साधनसुविधा उभारण्यासाठी आर्थिकरित्या मजबूत बनविणे आवश्यक आहे. गोव्याला कोणत्याही प्रकारची आर्थिक समस्या भेडसावू नये, यासाठी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर प्रयत्न करीत आहेत. पण, गोव्याची आर्थिक स्थिती बळकट बनविण्यासाठी संसदेत खाण  व्यावसायासंबंधी येणारे दुरुस्ती विधेयक मंजूर होणे गरजेचे आहे. हे विधेयक मंजूर होण्याकरीता फालेरो यांनी काँग्रेसचा सहकार्य मिळण्यासाठी पुढाकार घ्यावा असे काब्राल यांनी सांगितले.

फालेरो व आपण ध्येयधोरणे भिन्न असलेल्या पक्षांचे नते असलो तरी गोव्याच्या हितासाठी खाण प्रश्न मार्गी लागणे आवश्यक आहे, असे त्यांनी पुढे सांगितले.

भूमिगत विज वाहिन्या, विद्युत मनोरे, विज उपकेंद्र  उभारण्यासाठी लोकांचे योगदान महत्वाचे असून लोकांनी साहाय्य केल्यास पुढच्या काही वर्षात वीज संबंधी भेडसावणाऱ्या समस्या कमी होणार आहे.  गोव्यातील जनतेला 24 तास वीज पुरवठा करणे हे आपले लक्ष्य असून त्यासाठी प्रयत्न सुरु आहेत असे त्यांनी सांगितले. 

नावेली मतदारसंघाला पाणी व वीज समस्या मोठय़ा प्रमाणात भेडसावत होती. पण, आता पाण्याचा विषय मार्गी लागलेला असून विजेची समस्याही दुर होण्याचा वाटेवर असल्याचे  फालेरो यांनी सांगितले.  भूमिगत वीज वाहिन्या बसविण्यासाठी रस्ते खोदण्यात येत असल्यामुळे नावेली मतदारसंघात बन्च वीज वाहिन्या टाकाव्या अशी मागणीही त्यांनी केली.  

मीच कॉल सेंटर काब्राल

गोव्यातील जनतेला वीज संबंधी कोणत्याही प्रकारची समस्या भेडसावत असल्यास त्यांनी त्वरित 9822103292 या आपल्या क्रमांकावर मॅसेज करावा असे आवाहन मंत्री निलेश काब्राल यांनी केले. वीज समस्या सोडविण्यासाठी जनतेसाठी मी कॉल संटेर बनण्यास तयार आहे असेही त्यांनी स्पष्ट केले. वीज संबंधी उदभवणारी समस्या सोडविण्यासाठी या क्रमांकावर मॅसेज केला असता, मंत्री काब्राल यांनी त्वरित प्रतिसाद दिला, असे एका नागरिकाने सांगितले. 

Web Title: Appeal for co-operation with BJP Congress for mining amendment bill