सभापतींना ध्वजारोहणाचा अधिकार दिल्याने उच्च न्यायालयात पत्रवजा याचिका 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 ऑगस्ट 2018

खंडपीठाने या प्रकरणाची स्वेच्छा दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करण्याची विनंती करणारी या पत्रवजा याचिकेची प्रत सरन्यायाधीश व मुंबईच्या प्रभारी मुख्य न्यायमूर्तींना पाठविली आहे. 
 

गोवा - स्वातंत्र्यदिनी कार्यक्रमावेळी सभापती प्रमोद सावंत यांना ध्वजारोहण करण्यासाठी गोवा सरकारने नेमणूक केल्याप्रकरणी त्याविरोधात अॅड. आयरिश रॉड्रिग्ज यांनी आज मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात पत्रवजा याचिका दाखल केली आहे. खंडपीठाने या प्रकरणाची स्वेच्छा दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करण्याची विनंती करणारी या पत्रवजा याचिकेची प्रत सरन्यायाधीश व मुंबईच्या प्रभारी मुख्य न्यायमूर्तींना पाठविली आहे. 

ध्वजारोहण कार्यक्रमाची शान व त्याचे महत्त्व अबाधित राहण्यासाठी उच्च न्यायालयाने यामध्ये हस्तक्षेप करून नेहमी अवलंबिण्यात येत असलेल्या शिष्टाचारप्रमाणे त्याची अंमलबजावणी करण्याचे निर्देश द्यावेत अशी विनंती अॅड. रॉड्रिग्ज यांनी केले आहे. मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थित हा अधिकार मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्र्याला असतो मात्र तसे न करता तो सभापतींना देणे घटनेनुसार योग्य नाही असा दावा त्यांनी केला आहे. 

दरम्यान, मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी अमेरिकेला उपचाचारासाठी जाण्यापूर्वी सभापती प्रमोद सावंत यांना ध्वजारोहण करण्याचा अधिकार दिला आहे. या कार्यक्रमासाठी त्यांनी आपली निवड केल्याने त्यानुसार हे ध्वजारोहण करणार असल्याची प्रतिक्रिया सभापती सावंत यांनी यापूर्वीच केली आहे.

 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Appeal to the High Court for giving the right to Hoisting of the flag to Speaker