केरळ पुरग्रस्तांना पेटीएम, अॅमेझॉनवरुन मदतीचे आवाहन

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 ऑगस्ट 2018

सरकार व्यतिरिक्त पब्लिक प्लॅटफॉर्मवरही केरळ येथे बचावकार्यासाठी विविध पद्धतीने लोकांना आवाहन केले जात आहे. मनी ट्रान्सफर अॅप 'पेटीएम' द्वारे लोकांना आर्थिक मदतीचे आवाहन करण्यात आले आहे.

नवी दिल्ली : केरळमध्ये आलेल्या पुराने तेथील सगळे जनजीवन विस्कळीत केले आहे. वायनाड, इडुक्की, थालापुझा, एर्नाकुलम या जिल्ह्यांना पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे. 

पूरग्रस्त केरळमधील मदत आणि बचावकार्याला वेग आला असून, तिन्ही सेना दले आपत्तीग्रस्तांच्या मदतीसाठी सरसावली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आदेशानंतर केंद्रीय सचिव पी. के. सिन्हा यांनी आज उच्चस्तरीय बैठक घेत राज्यातील मदतकार्याचा आढावा घेतला.  

यासोबतच सरकार व्यतिरिक्त पब्लिक प्लॅटफॉर्मवरही केरळ येथे बचावकार्यासाठी विविध पद्धतीने लोकांना आवाहन केले जात आहे. मनी ट्रान्सफर अॅप 'पेटीएम' द्वारे लोकांना आर्थिक मदतीचे आवाहन करण्यात आले आहे. पेटीएम अॅप उघडल्यानंतर स्क्रिनवर अकरा पर्याय दिसतील. त्यापैकी एक पर्याय म्हणजे Kerala Floods (केरळ फ्लड) असा आहे. या पर्यायावर क्लिक केल्यानंतर अगदी साध्या पद्धतीने आपण केरळ पुरग्रस्तांना मदत करु शकतो. 
 

Paytm

ऑनलाइन शॉपिंग साइट 'अॅमेझॉन' वरही पुरग्रस्तांसाठी मदतीचे आवाहन करण्यात आले आहे. विविध सामाजिक संस्थांच्या मदतीने अॅमेझॉनवरुन कपडे, दैनंदिन गरजेच्या वस्तू जसे; भांडी, साबण, रेनकोट, छत्री, चप्पल, टॉवेल, पांघरुण, सॅनेटरी नॅपकिन्स, बकेट, टॉर्च इत्यादी काही वस्तू आपल्याला पुरग्रस्तांना पुरवता करता येतील. 

Amazon

सीएमडीआरएफ म्हणजेच केरळ सरकारचे चिफ मिनीस्टर डिट्रेस रिलिफ फंड यांच्याकडूनही आर्थिक आणि गरजेच्या वस्तूंच्या मदतीचे आवाहन करण्यात आले आहे.

CMDRF

याशिवाय देशभरात केरळच्या पुरात नुकसान झालेल्या लोकांसाठी प्रार्थना आणि मदतीचे प्रयत्न केले जात आहेत. पुण्यातील 'डू फॉर अदर्स' या संस्थेकडून 'आम्ही केरळ सोबत आहोत' असे म्हणत अन्न, वस्त्र, औषधे, प्राण्यांसाठी अन्न किंवा दैनंदिनीतील काही गरजेच्या गोष्टी यांना डोनेट करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

Pune

 

 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Appeal for victims of Kerala flood by Paytm Amazon CMDRF