'ऍपल'ची संगणक प्रणाली हॅक 

वृत्तसंस्था
शनिवार, 18 ऑगस्ट 2018

सिडनी : आय फोन निर्मितीत आघाडीवर असलेल्या "ऍपल' या अमेरिकन कंपनीत काम करण्याची आकांक्षा बाळगून असलेल्या एका 16 वर्षीय मुलाने कंपनीची संगणक प्रणाली हॅक केल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला. पोलिसांनी या मुलाला ताब्यात घेतले असून, यूजर्सचा डेटा सुरक्षित असल्याची माहिती कंपनीच्यावतीने देण्यात आली आहे. 

या मुलाचे नाव जाहीर करण्यात आलेले नसून, तो मेलबर्न येथील रहिवासी असल्याचे सांगण्यात आले. "ऍपल' फॅन असलेला हा शालेय विद्यार्थी गेल्या वर्षभरापासून कंपनीच्या संगणक प्रणालीत घुसखोरी करत होता. विशेष म्हणजे कंपनीला याची भणकही नव्हती. अखेर हा प्रकार कंपनीच्या टीमच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी "एफबीआय'ला याची माहिती दिली. त्यानंतर ऑस्ट्रेलियातील पोलिसांनी या मुलाला ताब्यात घेतले. 

या मुलाने कंपनीच्या सर्वरवरून सुमारे 90 जीबी डेटा डाउनलोड केला असून, यात कंपनीच्या यूजर्सच्या माहितीचाही समावेश असल्याचे चौकशीत समोर आले आहे. 

हॅकी..हॅक...हॅक 

हा प्रकार उघड झाल्यानंतर पोलिसांनी या मुलाच्या घरावर छापा टाकून दोन लॅपटॉप जप्त केले. त्यात या मुलाने डाउनलोड केलेला डेटा "हॅकी हॅक हॅक' या फोल्डरमध्ये लपवून ठेवला होता. लॅपटॉपचे सिरियल नंबर आणि आयपी ऍड्रेसची खात्री पटली असून, पुढील महिन्यात न्यायालय त्याला शिक्षा सुनावणार आहे. 

Web Title: Apples Computer System Hack